मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात, दिग्गज मराठी कलाकार केदार शिंदे आणि अंकुश चौधरी थोडक्यात बचावले

राज ठाकरे यांच्या ताफ्याचा अपघात, दिग्गज मराठी कलाकार केदार शिंदे आणि अंकुश चौधरी थोडक्यात बचावले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Chetan Patil

औरंगाबाद, 30 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्यांचा अपघात (Raj Thackeray convoy accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघात झालेल्या गाड्यांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) यांच्या गाडीचादेखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यातील सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या मर्सिडीज गाडीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने अकुंश चौधरी आणि केदार शिंदे या अपघातातून बचावले आहेत. दोन्ही दिग्गज कलाकार हे सुखरुप आहेत.

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज ते पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. राज ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. त्यांच्यासोबत जवळपास 30 ते 40 गाड्यांचा मोठा ताफा औरंगाबादच्या दिशेला रवाना झाला होता. या दरम्यान औरंगाबादपासून 20 किमी अंतरावर असताना सात ते आठ गाड्यांचा अपघात झाला. या गाड्या हायवेवर प्रचंड वेगात होत्या, अशीदेखील माहिती समोर येत आहे.

(राणा दाम्पत्याचा कोठडीतला मुक्काम पुन्हा वाढला, जेल की बेल? आता सोमवारी फैसला)

'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांच्या ताफ्याचा आज सकाळीदेखील अपघात झाला होता. त्यानंतर औरंगाबादजवळ घडलेला दुसरा अपघात आहे. पुढे असलेल्या गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्या आज दिवसभरातील दौऱ्याविषयी माहिती

राज ठाकरे यांना आज सकाळी साडेनऊ वाजता 100 पुरोहीतांनी आशीर्वाद दिले. त्यानंतर राज ठाकरे सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला रवाना झाले. या दरम्यान ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले. राज ठाकरेंनी दुपारी एक वाजता कार्यकर्त्यांसोबत भोजन केलं. राज ठाकरे यांच्या ताफ्याने दुपारी तीन वाजता अहमदनगर शहरात प्रवेश केला. राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर वाळूज एमआयडीसीमध्ये कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे स्वागत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजता राज ठाकरे यांचा औरंगाबाद शहरात प्रवेश झाला. क्रांती चौकात मनसेकडून राज ठाकरे यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज ठाकरेंनी यावेळी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर सव्वा सहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोहचले.

First published: