मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, नाहीतर महाराष्ट्रात काय घडेल...', सभेदरम्यान अजानचा आवाज ऐकू येताच राज ठाकरे संतापले

'त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, नाहीतर महाराष्ट्रात काय घडेल...', सभेदरम्यान अजानचा आवाज ऐकू येताच राज ठाकरे संतापले

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या कानावर मैदानाच्या शेजारी असलेल्या मशिदीमधून येणारा अजाणचा आवाज पडला आणि ते संतापले. त्यांनी पोलिसांना थेट इशाराच दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या कानावर मैदानाच्या शेजारी असलेल्या मशिदीमधून येणारा अजाणचा आवाज पडला आणि ते संतापले. त्यांनी पोलिसांना थेट इशाराच दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या कानावर मैदानाच्या शेजारी असलेल्या मशिदीमधून येणारा अजाणचा आवाज पडला आणि ते संतापले. त्यांनी पोलिसांना थेट इशाराच दिला.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 1 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यावेळी सभेच्या बाजूला असलेल्या मशिदीमध्ये अजान होणार होती. याची माहिती कळताच राज ठाकरे संतापले. जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

माझी पोलिसांना विनंती आहे, जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे, जर ती ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, अजिबात शांत बसू नका, संभाजीनगर पोलिसांना हात जोडून विनंती आहे, जर हे असे वागत असतील महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ते दाखवूनच देऊ' असा इशाराच राज ठाकरेंनी दिली.

राज ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं, वाचा :

इथे बसायला सोडा, उभं राहायला जागा नाही. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, आपल्या घोषणा आणि बोलणं थांबलं तर मला अनेक विषय बोलता येतील. बाहेर अजून हजारो लोक आहेत की त्यांना आतमध्येलयेता येत नाही. कारण आतमध्ये जागाच नाही.

सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो.

खरंतर सभा होणार, नाही होणार, राज ठाकरेने सभा घ्यावी, न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार, नाही मिळणार, खरंतर का ही गोष्ट केली मला अजूनही समजलेली नाही. मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात सभा घेतली तरी तुम्ही टीव्हीवरुन पाहिलंच असतं तर. मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेतली. त्या सभेनंतर बरेचजण बडबडायला लागले. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा एक ठाण्यात घेतली. खरंतर मी दोनच सभा घेतल्या. पण या दोन सभेवरती हे किती बोलत आहेत.

ठाण्यात ज्यावेळेला सभा झाली, दिलीप धोंधरेंनी फोन केला, त्यांनी संभाजीनगरला एक सभा घेऊया सांगितलं. संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मी हो सांगितलं. आता हा विषय फक्त संभाजीनगरपुरता मर्यादीत नाही. आता यापुढच्या प्रत्येक सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. तसाच विदर्भातही जाणार आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. पण या सभां आडकाठी आणून काहीच होणार नाही. कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. कोंबजा झाकायचा ठेवला तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. सूर्य उगवतोच.

आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये, जी काही उरलीसुरली आहे ती संभाजीनगरमध्ये काढू. मला कल्पना आहे की, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगर शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. दहा-दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. पण आजचे जे प्रमुख विषय आहेत त्या विषयांना घेऊन मी बोलणार आहे.

(महाराष्ट्राची डोकी का फिरवतीत? जातीपातीचं विष का पेरलं? राज ठाकरेंचा पवारांना सवाल)

संभाजीनगरचं मुळ नाव खडगी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक आमचा देवगिरीचा किल्ला, त्याच्या अगोदरची आमची पैठण. मला असं वाटतं आजचा महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल (जमीन) सटकला आहे. आपण कोण आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राचे, मराठी आहोत. या महाराष्ट्राने या देशाला काय-काय दिलं. मुळात हा देश नव्हता तर भूमी होती.

आमचे ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला इथे आला आणि आमच्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये शिरला, एका अल्लाउद्दीन खिल्जीने एक लाख लोकं घेऊन येतोय म्हणून सांगितलं. यादव आमचा राजा बेसावध राहिला. आमच्या किल्ल्यामध्ये फितुरी झाली. ते एक लाख लोकं येणारी नव्हतीच. लोकं काही हजारात होती. मी जेव्हा हा इतिहास वाचतो तेव्हा कळतो. अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतंय ही महाराष्ट्रातील पहिली फेकन्यूज. हल्ली सोशल मीडियावर फेकन्यूज येते. आमची महाराष्ट्राची कन्या यादवांची मुलगी खिलजी पळवून घेऊन गेला. महाराष्ट्रात अंध:कार झाला. पुढचे साधारण 400 वर्ष महाराष्ट्र खिदपत होता. महाराष्ट्रातील माता-भगिनींवर अत्याचार होत होते. बलात्कार होत होते. मंदिरं पाडली जात होती. याच पैठणला आमच्या संत एकनाथांनी हाक दिली, दार उघड बये दार उघड, हे नाही आता पाहवत. 1630 साली दार उघडलं, आमच्या छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं जगायचं आणि काय जगायचं ते आमच्या राजाने शिकवलं.

महाराज गेले, नांदेडला राहणारे खूप मोठे लेखक नरहर पुरुंदकर यांच्या पुस्तकात फार छान वर्णन करण्यात आलं आहे. आपण फक्त काय विचार करतो, अफजलखानाचा पोताडा पाडला, शाहिस्तखानाची बोटं छाटली, आग्र्याहून निसटले. केवळ 50 वर्षाचं आयुष्य, इतका मोठा हा राजा, बादशाह औरंगजेब शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तिथून निसटल्यानंतर सर्वकाळी सोडून आला. महाराष्ट्रात औरंगजेब 1681 साली आला. आणि महाराजांचं 1680 साली निधन झालं. औरंगाजेबला माहिती नव्हतं की आपण ज्याच्यासाठी महाराष्ट्रात चाललोय तो माणूसच या जगात नाहीय. तरीपुढची 27 वर्षे या महाराष्ट्रात राहिला आणि इथे मेला. परत कधी आग्र्यात गेला नाही. इथे संभाजी महाराज त्याच्याशी लढले. संताजी, धनाजी लढले. राजाराम महाराज, ताराराणीसाहेब लढल्या. तो 1707 साली इथे मेला. औरंगजेबाने जी पत्र पाठवले आहेत त्यामध्ये तो कुणाचाही उल्लेख करत नाही. तो पत्रामध्ये म्हणतो की शिवाजी मला अजूनही छळतोय. ही प्रेरणा आहे, त्या प्रेरणाला तो शिवाजी म्हणतोय. औरंगजेबाला कळलं होतं की, शिवाजी व्यक्ती नाही तर विचार आहे.

आम्ही महापुरुषांच्या फक्त पुण्यतिथी आणि जयंत्या साजरा करतोय. आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे, ते म्हणाले, आमच्या लोकांमध्ये देवी येते, भूतं येतात, ज्यादिवशी या समाजाच्या अंगात शिवाजी येईल त्यादिवशी आख्ख जग पादक्रांत करुन टाकू. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. ही आमची मराठेशाही आणि महाराष्ट्र!

महाराष्ट्राची आज काय परिस्थिती चाललीय? आमच्या महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली जातेय. रोज आमच्या महाराष्ट्रातील नेते वाट्टेल ते बरळत आहेत. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ते राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील? टीव्हीवर आज जे दिसतंय ते राजकारण आहे? हा आपला महाराष्ट्र आहे? ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला,

यांच्या सगळ्यांचं बोलणं आम्ही हसण्यावर घेतोय. यासाठी आम्हाला महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आहे? जनता आम्ही काही बोधच घेणार नाही आहोत. सर्वात जास्त समाजसेवक, विचारवंत या महाराष्ट्रात जन्माला आले. पण आपण आज महाराष्ट्राची काय अवस्था करुन ठेवलीय, आई-बहिणीवरुन शिव्या घालत आहेत. कोणी मुद्द्याचं बोलायलाच तयार नाही. सगळेजण हुद्द्यावर बोलत आहेत. आम्ही तरुणांना काय शिकवतोय, हुल्लडबाजी? याचं कारण आमचं लक्षच नाही. राज ठाकरेंचं भाषण आहे, घोषणा द्या, निघायचं आणि.. आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या हाताला काही लागत नाही, सगळ्या राजकारण्यांना हेच हवं आहे. माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सगळे फरफडायला लागले.

शरद पवारांवर टीका

शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय. प्रत्येक व्यक्ती जातीत बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे ते बघून बोलायचं. मी त्यादिवशी जेव्हा बोललो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युट्यूबवरच्या सगळ्या सभा काढून बघा, त्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आता बोलायला सुरुवात झाली. मी बोलल्यानंतर सुरुवात झाली. काहीतरी व्हिडीओ काढत आहेत. तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचां पुस्तक ठेवलंय. कशाला खोटं दाखवताय?

मी त्यादिवशी म्हटलं, शरद पवार हे नास्तिक आहेत. लागलं, झोंबलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. लगेच देवाचे सगळे फोटो काढले. पुजा करताना आणि नमस्कार करताना. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत, असं बोलली आहे. आता याहून अधिक काय पुरावा देऊ? जिकडे सभा घेतायत तिथे बोलत आहेत की, राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत म्हणून. मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत. आख्खी पुस्तकं संदर्भासहीत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल.

माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो. त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षूकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं. महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे माझे आजोबा होते.

जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाला. मराठा बांधवाची माथी भडकवायची. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढलं. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत.

तुमची केंद्रात सत्ता होती तेव्हा जेम्स लेनला का नाही आणलंत? महाराष्ट्राची का डोकी फिरवलीत? कशासाठी हे विष पाजलत? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते की नव्हते असा वाद उकरुन काढायचे. रामदास स्वामींकडे तुम्ही जातीय पाहणार? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराज शिष्य होते? किंवा शिवाजी महाराज रामदास स्वामी गुरु होते असे बोलले का? रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय त्यापेक्षा उत्कृष्ठ आजपर्यंत मी कुठेच वाचलेलं नाही.

प्रत्येकवेळा बोलताना शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, हो शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच. पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव आलं नाही. शिवाजी महाराजांचा कधी फोटोही आधी नसायचा. जातीचं कालवलेलं विष हे शाळा-कॉलेजपर्यंत गेलं. तिथेही आता विचार करायला लागले. इथपर्यंत घाण राजकारण आणलं. आम्ही जातीतून बाहेर येत नाही, हिंदू कधी होणार, मराठी कधी होणार? आमच्याकडे जातीने विळखा घालून ठेवलाय.

First published: