मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /G20 : आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

G20 : आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद सज्ज, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

G20 : औरंगाबादमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad [Aurangabad], India

  सुशील राऊत, प्रतिनिधी

  औरंगाबाद, 26 फेब्रुवारी :  नवी दिल्लीमध्ये यावर्षी G-20 देशांची परिषद होणार आहे. या परिषदेच्या निमित्तानं देशभर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. या परिषदेच्या निमित्तानं औरंगाबादमध्येही आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ भेट देणार आहे.  औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून  त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या परिषदेचं महिला शिष्टमंडळ सोमवारी (27 फेब्रुवारी) रोजी शहरामध्ये येणार आहे. त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनही सज्ज आहे. त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  औरंगाबादमध्ये  27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान G20 परिषदेच्या निमित्तानं शिष्टमंडळ येणार आहे.  वेगवेगळ्या देशातील आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगरमध्ये येणार आहेत यादरम्यान ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बीबीचा मकबरा आणि शहरातील विविध पर्यटन स्थळांना  भेटी देणार आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रत्येक देशाचे प्रतिनिधी शहरांमध्ये येणार असल्यामुळे प्रशासनातर्फे मोठी खबरदारी बाळगण्यात येत आहे.

  RBI ची औरंगाबादमधील बँकेवर मोठी कारवाई, अनेकांचे पैसे अडकले

  औरंगाबादमध्ये 2 मार्चपर्यंत ड्रोन कॅमेरे उडवण्यासाठी बंदी असल्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी दिले आहेत. आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने महत्त्वाच्या देशांचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येणार मध्ये येणार असल्यामुळे असामाजिक तत्त्वांकडून अन्य व्यक्तींकडून ड्रोनचा वापर करून शहरात घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  G20: हौशी चित्रकारांना मिळणार मोठी संधी, सहभागी होण्यासाठी 'हे' करा काम

  खबरदारीचा उपाय म्हणून  हॉटेल रामा इंटरनॅशनल , छत्रपती संभाजी नगर ते विद्यापीठ परिसर औरंगाबाद लेणी तसेच बीबी का मकबरा व इतर पर्यटन स्थळावरती सुमारे दोन किलोमीटरचे परिघातील परिसरात ही बंदी आहे. पोलीस आयुक्तांनी काढलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ड्रोन मालकांवरती भारतीय दंड संहिता 1860 चा कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Aurangabad, Local18