मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : नामांकित कंपन्यांमध्ये 5312 जागांवर होणार भरती, लगेच करा इतकं काम!

Aurangabad : नामांकित कंपन्यांमध्ये 5312 जागांवर होणार भरती, लगेच करा इतकं काम!

प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने दिनांक 17 आणि 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. औरंगाबाद मधील नामांकित कंपन्यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे.  देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. तसेच तरुणांनी त्यापेक्षा रोजगार देणारे बनावे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. यासाठी मुद्रा योजना सारख्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आज या रोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड या रोजगार मेळाव्यात बोलताना म्हणाले. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बालविकास विभाग मंगल प्रभात लोढा, यांच्यासह केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योजक, आमदार हरिभाऊ बागडे, आ.प्रशांत बांब उपस्थित होते. हेही वाचा : Aurangabad : सणासुदीच्या काळात भाडेवाढ; रिक्षात बसताच मोजावे लागणार 26 रूपये या मेळाव्यात औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. याचप्रमाणे या मेळावा ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कंपन्या सहभागी या महारोजगार मेळाव्यामध्ये बजाज ऑटो लि, एनआरबी बेअरींग प्रा.लि,फोर्ब्स ॲन्ड कंपनी लि, अजंता फार्मा लि , पॅरासन मशिनरी इंडिया प्रा.लि , अजित सीड्स प्रा. लि, न्युट्रीविडा न्युट्रास्युटिकल्स, नवभारत फर्टीलायजर, मराठवाडा ऑटो कॉम प्रा.लि, लुमीनाज सेफ्टी ग्लास प्रा.लि, लक्ष्मी मेटल प्रेसींग वर्क प्रा.लि, लक्ष्मी रिक्षा बॉडी पार्ट प्रा.लि, रत्नप्रभा कार्स प्रा.लि, मायलन लॅबॉरेटरीज, व्हेरॉक इंजिनीअरींग लि , पित्ती इंजिनीयरींग लि , ग्राइंड मास्टर मशीन इंडिया, प्रा.लि, गुडइयर साऊथ एसिया टायर्स प्रा. लि, पर्किन्स इंडिया प्रा.लि, इत्यादी औरंगाबाद जिल्ह्यातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

हेही वाचा : मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचा पहिला दिवस कसा होता? पाहा 74 वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव Video

इंजिनीअरींग पदवी, पॉलिटेक्नीक डिप्लोमा, आयटीआय तसेच इतर विज्ञान, वाणिज्य व कला शाखा पदवीधर, दहावी ,बारावी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची साधारणपणे 2283 आणि अँप्रेंटिसशीपसाठी 3029 अशी एकूण 5312 पदे उपलब्ध आहेत. विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑलनाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या