मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपोषणस्थळी झळकला औरंगजेबचा फोटो

MIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या उपोषणस्थळी झळकला औरंगजेबचा फोटो

नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करत आहे.

नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करत आहे.

नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad Cantonment, India

छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णयाला केंद्र आणि राज्य सरकराने परवानगी दिली आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत उपोषणाला बसले आहे. पण, यावेळी औरंगजेबचे फोटो झळकवण्यात आले आहे.

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत इम्जियाज जलील उपोषणाला बसले आहे. पण उपोषणस्थळी जलील समर्थकांनी औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी करत फोटो झळकावला आहे. 'जब तक सुरज चाँद रहेंगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा' अशा घोषणाच या समर्थकांनी दिल्या. औरंगजेबच्या घोषणाबाजी केल्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

(हा काय कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली)

आज सकाळपासून नामांतराच्या निर्णयाविरोधात जलील छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करत आहे. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचं श्रेय मिळावं म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी उपोषण करत असल्याचं, जलील यांचं म्हणणं आहे.

('कसबा झाकी है...' संजय राऊतांनी सांगितला 2024 च्या विजयी जागांचा आकडा!)

तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ दुपारी 12 वाजता मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. मनसेनं जलील यांच्या उपोषणाला विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवली आहे.

First published:
top videos