मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लहान मुलांच्या भांडणात मामाचा बळी, खेळण्यावरून भांडण झाल अन्...; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना

लहान मुलांच्या भांडणात मामाचा बळी, खेळण्यावरून भांडण झाल अन्...; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांमध्ये खेळण्यावरून झालेल्या भांडणामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 7 मार्च: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांमध्ये खेळण्यावरून झालेल्या भांडणामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. दशरथ अंबादास रोकडे वय 40 रा. मोतीवाला कॉलनी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र दशरथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून, आम्ही लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

खेळण्यावरून भांडण

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लहान मुलांमध्ये खेळण्यावरून भांडण झाले. हे भांडण मोठ्यांपर्यंत पोहोचले. आपल्या बहिणीशी भांडणाऱ्या शेजारच्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दशरथ रोकडे यांना संबंधित महिला व इतर तरुणांनी बेदम मारहाण केली.या मारहाणीमध्ये दशरथ बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी तातडीनं चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उपचारादरम्यान मृत्यू

दशरथ यांच्या घराशजारीच त्यांची बहीण उषा हातागळे या राहतात. रविवारी उषा यांच्या मुलांशी शेजारच्या महिलेच्या मुलांचे भांडण झाले. हा वाद मोठ्यापर्यंत पोहोचला. दशरथ यांची बहीण उषा हातागळे आणि शेजारच्या महिलेचे जोरदार भांडण सुरू झाले. हे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दशरथ यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मराहणीमध्ये बेशुद्ध पडलेल्या दशरथ रोकडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime news