मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : औरंगाबादमध्ये Omicron चा शिरकाव, 2 प्रवासी पॉझिटिव्ह

BREAKING : औरंगाबादमध्ये Omicron चा शिरकाव, 2 प्रवासी पॉझिटिव्ह

 
मुंबई, पुणे, विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

मुंबई, पुणे, विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

मुंबई, पुणे, विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे.

औरंगाबाद, 25 डिसेंबर : राज्यभरात कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron Variant) धुमकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता इतर शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. आता औरंगाबादमध्ये सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. शहरात दोन प्रवासी ओमायक्रॉन बाधित आढळले आहे.

मुंबई, पुणे, विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. आता औरंगाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहे. दुबईवरून दोन प्रवासी आले होतो. या दोन्ही प्रवाशांची चाचणी घेण्यात आली होती.  त्यानंतर आज या दोन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि महापालिका आरोग्य यंत्रणेनं दिली आहे. एक रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एकाचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 100 पार

दरम्यान, शुक्रवारी राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २० रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील 14 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर 6 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी रिपोर्ट केले आहेत. पुण्यात आज ६ रुग्ण आढळले आहे. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत १ रुग्ण तर पुणे छावणी बोर्डाच्या हद्दीत ५ रुग्ण आढळून आले आहे.

तर मुंबईमध्ये एकूण ११ रुग्ण आढळले आहे.  तर सातारा  २, अहमदनगर  १ यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. या २० रुग्णांपैकी १५ जण हे आंतरराष्ट्रीय प्रवासी, तर २ आंतरदेशीय प्रवासी आणि ४ जणांना ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संपर्कातून लागण झाली आहे. यात १२ रुग्णांचे लसीकरण हे पूर्ण झाले होते. तर ७ रुग्णांचे लसीकरण झाले नाही आणि १ रुग्णाचे वय हे १८ वर्षांखालील आहे. दरम्यान, आज राज्यात १४१० रुग्णांचे निदान झाले आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ रुग्ण बरे झाले आहे.

First published: