Home /News /maharashtra /

Aurangabad : Corporate क्षेत्रात करिअर करायचंय? 'हा' कोर्स करा मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Aurangabad : Corporate क्षेत्रात करिअर करायचंय? 'हा' कोर्स करा मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

title=

औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयांमध्ये ऑफिस मॅनेजमेंट ( Office Management Course ) हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

  औरंगाबाद, 03 ऑगस्ट : दिवसेंदिवस कॉर्पोरेट ( Corporate )  क्षेत्र वाढत आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची ( Skilled Workers ) गरज आहे. यासाठी कंपनीचे व्यवस्थापक व कंपनीच्या मालकांना कमी खर्चात कमी पैशांमध्ये कमी जागेमध्ये दर्जेदार काम करणाऱ्या कुशल कामगारांची आवश्यकता भासत आहे आणि यामुळे या क्षेत्रात दर्जेदार काम करणाऱ्या अशा कुशल कामगारांचा बोलबाला वाढला आहे. तुम्हालाही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेलतर ऑफिस मॅनेजमेंट ( Office Management Course ) हा कोर्स महत्त्वाचा ठरू शकतो. चला तर मग या कोर्स बद्दल थोडक्यात माहिती बघूया... कॉर्पोरेट क्षेत्रात कुशल कामगारांची गरज लक्षात घेता औरंगाबाद शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयांमध्ये ऑफिस मॅनेजमेंट हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येणार आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार आहे. हा कोर्स 2 वर्षाचा असून कॉर्पोरेट क्षेत्राला गरजेच्या असलेल्या सर्व तांत्रिक गोष्टी या कोर्सच्या माध्यमातून शिकवल्या जाणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी मदत होईल.

  हेही वाचा: Aurangabad : दहावीनंतर व्यवसाय करण्यासाठी 'हा' कोर्स करा, तुमचा होईल फायदा VIDEO

  असा घेऊ शकता प्रवेश या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी दहावीचे मूळ मार्क मेमो,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड ची झेरॉक्स, दोन फोटो, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत. यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपुरा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या समोर सरस्वती भुवन महाविद्यालय आहे. यासाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्ही पुढील ईमेल आयडी omghingate@gmail.com वरती संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी 9922333291 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता. गुगल मॅप वरून साभार... विद्यार्थ्यांसाठी या आहेत सुविधा  सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुसज्ज अशी लायब्ररी आहे. ज्यामध्ये शहरातील सर्वात मोठ्या लायब्ररीमध्ये या लायब्ररीचा समावेश आहे तसेच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर लॅब उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या सरस्वती भुवन मध्ये येण्यासाठी स्मार्ट सिटी बसचा वापर विद्यार्थ्यांना करता येऊ शकतो. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध आहेत. हेही वाचा:  Nashik : घरामध्येच सुरू केला मसाला उद्योग; आज महिन्याला होतेय दीड लाखांची कमाई येथे मिळू शकते प्लेसमेंट ऑफिस मॅनेजमेंट हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऋचा इंडस्ट्रीज, सिपेट इंडोर्स यासारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. यासाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न देखील केले जातात. त्यासोबतच एमबीए, पर्यवेक्षक, मेजर सी एस इत्यादी क्षेत्रांमध्ये आपले स्वतःचे करिअर घडवता येते. या क्षेत्रात करिअर करत असताना कमीत कमी 30 हजारांपासून पगाराची सुरुवात होते. तर जास्तीत जास्त 30 ते 35 हजार रुपये महिना विद्यार्थ्यांना मिळू शकतो.
  First published:

  Tags: Aurangabad, Aurangabad News, Career opportunities

  पुढील बातम्या