Home /News /maharashtra /

शेतीत कमाई नाही, हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय बेस्ट; शेतकऱ्याने तब्बल 7 कोटींचं मागितलं लोन

शेतीत कमाई नाही, हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय बेस्ट; शेतकऱ्याने तब्बल 7 कोटींचं मागितलं लोन

शेतीत कमाई नसल्याचं सांगत, शेतकऱ्याने पद्धतशीर बँकेकडे 6.65 कोटी रुपयांच्या लोनसाठी अर्ज सादर केला आहे.

  हिंगोली, 17 जून : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील 22 वर्षीय शेतकऱ्याने (Maharashtra Farmer) हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या हेतूने लोनसाठी (Helicopter Loan) अप्लाय केला आहे. या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर विकत घेऊन ते भाड्याने देण्यासाठी बँकेकडून तब्बल 6 कोटी रुपयांच्या लोनसाठी अर्ज दाखल केला आहे. शेतकऱ्याने सांगितलं की, शेतीतून नफा होत नाही, त्यामुळे उत्पन्नाचं दुसरं साधन शोधायला हवं. त्याअंतर्गत हेलिकॉप्टर खरेदी करून तो भाड्याने देण्याची इच्छा आहे.

  औरंगाबाद जिल्ह्याच्या टकटोडा गावातील निवासी कैलास पतंगे यांनी गुरुवारी आपल्या लोनच्या अर्जासाठी गोरेगावमधील एका बँकेशी संपर्क केला. दोन एकर जमिनीचे मालक असलेले पतंगे यांनी सांगितलं की, नापिकी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यांसारख्या परिस्थितीमुळे गेल्या काही वर्षात शेती करणं सोपं राहिलेलं नाही. पतंगे पुढे म्हणाले की, मी गेल्या दोन वर्षात माझ्या शेतात सोयाबीनची शेती केली. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मला चांगला परतावा मिळाला नाही. हेलिकॉप्टर खरेदी करून भाड्याने देणार... शेतकरी पतंगेने सांगितलं की, अद्याप पीक विम्याचे पैसेही पूर्ण नाही आले. या सर्व गोष्टींचा विचार करता एक सुखी आयुष्य घालवण्यासाठी पतंगेने हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा विचार केला. हे हेलिकॉप्टर भाड्याने देऊन त्यातून पैसे कमवण्याचा शेतकऱ्याचा विचार आहे. पुढे ते म्हणतात, कोण म्हणतं की, मोठी माणसंच मोठं स्वप्न पाहू शकतात. शेतकरीदेखील मोठं स्वप्न पाहू शकतो. मी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 6.65 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अप्लाय केला आहे. इतर व्यवसायांमध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे मी हेलिकॉप्टरच्या व्यवसायाचा विचार केला.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Aurangabad News, Farmer

  पुढील बातम्या