मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल' : नितीन राऊत

'कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, वीज वापराल तर बिल भरावंच लागेल' : नितीन राऊत

राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा.

राज्यामध्ये जी संकटे निर्माण झालं ते कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, आम्ही काम करतो आहे. मात्र काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावा.

No one will get free electricity said Minister Nitin Raut: राज्यात कुणालाही फुकटात वीज मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद, 17 डिसेंबर : कोरोना आणि लॉकडाऊन काळात सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच वीज खात्याकडून अनेक नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल देण्यात आले. यानंतर वीज बिल (Electricity bill) माफ करावं अशी मागणी होऊ लगाली. अनलॉक झाल्यानंतर ग्रामीण भागात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळलं. यामुळे थकीत वीजबिल माफ करा अशी मागणी होत आहे. मात्र, राज्यात कुणालाही फुकटात वीज मिळणार नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. (No one will get free electricity in Maharashtra said Minister Nitin Raut)

औरंगाबाद (Aurangabad) येथील एका कार्यक्रमात ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, वीज कुणालाही फुकटात मिळणार नाही. वीजेचा वापर कुणी करत असेल तर त्यांना वीजेचं बिल भरावं लागणार आहे. महावितरण काही फुकटात वीज घेत नाही किंवा कंपन्या महावितरणला फुकटात वीज देत नाही. ज्या कंपन्या वीज निर्माण करतात त्यांना कोळसा विकत घ्यावा लागतो, बँकांकडून कर्ज घ्यावं लागतं. त्यांना पैसा आवश्यक आहे. महावितरणकडे जर पैसेच राहिले नाही तर महावितर बंद होईल. राज्यात महावितरणने काम केले नाही तर खाजगी कंपन्या येथे येतील.

वाचा : मविआ सरकारमध्ये निधी वाटपात मोठी असमानता; राष्ट्रवादी तुपाशी, शिवसेना उपाशी

नितीन राऊत पुढे म्हणाले, सरकार वर अनेक संकट आली. वीज थकबाकी मागच्या सरकारने 5 वर्ष बिल दिले नाहीत आणि तेच आपल्या माथ्यावर आलं आहे. मागच्या सरकारची थकबाकी आहे. चांगली वीज बिल वसुली करेल त्याला बक्षीस द्यावे लागेल. महापारेशन आणि महानिर्मिती मी आलो तसं फायद्यात आली आहे. फिडर बंद केले तर शेतकाऱ्यांसोबत महावितरण चे नुकसान होतं, शेतकऱ्यांना स्मार्ट मीटर लावले की समस्या मिटेल.

भाजपचा आंदोलनाचा इशारा

तर दुसरीकडे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत आक्रमक भूमिका घेतली आहे. चालू वीजबिल भरण्यास शेतकरी तयार आहेत. थकबाकीचा भार टाकू नका, थकीत वीजबिल माफ करा अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. यासोबतच थकीत वीजबिलाचा भार शेतकऱ्यांवर टाकला तर मोर्चा काढू असा इशाराही प्रशांत बंब यांनी दिला आहे.

400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन तसेच ऊर्जा संवर्धन आठवड्याचे औचित्य साधून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते 14 डिसेंबर रोजी चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा म्हणून राज्यात साजरा केला जातो. महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबबंध स्पर्धा आयोजन करण्यात येत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Electricity bill