मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Rape in Aurangabad: वाळूज तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत शेजारी राहणाऱ्या तरुणाने विकृत कृत्य केलं आहे.

वाळूज, 12 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या वाळूज (Waluj) तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका 24 वर्षीय तरुणानं 30 वर्षीय विवाहित महिलेला पेढ्यातून गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार (married woman raped by neighbour) केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील आपल्या मोबाइलमध्ये शूट (Shoot obscene video) केला होता. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेचं वारंवार लैंगिक शोषण केलं आहे.

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेनं वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीवर बलात्कारासह ब्लॅकमेलच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. नितीन अशोक पतंगे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो रांजणगाव शेणपुंजी येथील जयभद्रा शाळेजवळ नर्सरी कॉलनी येथील रहिवासी आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-रात्रभर मारल्या चकरा अन् पहाटे पाडला रक्ताचा सडा; झोपलेल्या पत्नीचा खेळ खल्लास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि मुलांसह रांजणगावात पतंगेच्या कॉलनीत भाड्याने राहत होती. याचदरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर  8 एप्रिल 2021 रोजी आरोपी नितीन याने पीडित महिलेला गुंगीचं औषध टाकलेला पेढा खायला दिला होता. त्यामुळे पीडित महिला बेशुद्ध झाली होती. याचा फायदा घेत नितीनने बेशुद्धावस्थेतील महिलेवर बलात्कार केला आणि संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. शुद्धीवर आल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलं.

हेही वाचा-कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर रेप

पण घटनेची वाच्यता केल्यास संबंधित व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीनं दिली. यानंतर ब्लॅकमेल करत आरोपीनं चार महिने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. 20 नोव्हेंबर रोजी देखील आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेनं सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने धीर दिल्यानंतर पीडितेनं वाळूज पोलीस ठाण्यात नितीन विरोधात गुन्ह दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Crime news, Rape