जालना, 13 जानेवारी : माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांनी आपल्या पत्नीसाठी गाणं म्हटलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये राजेश टोपे यांनी आपली पत्नी मनिषा टोपे यांच्यासाठी गाणं गायल आहे.
या गाण्यामधून राजेश टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मेरी मेहूबा हो मेरी मेहूबा हा तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' असे या गाण्याचे बोल आहेत.
'तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्नीसाठी गायलं गाणं pic.twitter.com/NAn4hYen5w
— News18Lokmat (@News18lokmat) January 13, 2023
वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन
राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मतदारसंघ असलेल्या घनसावंगीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राजेश टोपे यांनी आपली पत्नी मनिषा टोपे यांच्यासाठी गाणं म्हटलं आहे. या गाण्यातून त्यांनी आपल्या पत्नीबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मेरी मेहूबा हो मेरी मेहूबा हा तुम बिलकूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajesh tope