मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

National tourism day : पुरातत्व विभागाकडून पर्यटकांना खास भेट, औरंगाबादच्या सौंदर्यात नवी भर, Video

National tourism day : पुरातत्व विभागाकडून पर्यटकांना खास भेट, औरंगाबादच्या सौंदर्यात नवी भर, Video

X
National

National tourism day : पुरातत्व विभागाकडून पर्यटकांना खास भेट देण्यात येणार आहे.

National tourism day : पुरातत्व विभागाकडून पर्यटकांना खास भेट देण्यात येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India

औरंगाबाद, 25 जानेवारी : औरंगाबाद शहरातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून बीबी का मकबरा याकडे बघितलं जातं. बीबी का मकबऱ्याला भेट देण्यासाठी देशी विदेशी पर्यटक येत असतात. आता येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी राष्ट्रीय पर्यटन दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुरातत्व विभागाच्या वतीने विशेष भेट देण्यात येणार आहे. 26 जानेवारी पासून बीबी का मकबरा लखलखत्या दिव्यांमध्ये उजळणार आहे, अशी माहिती पुरातत्त्व शास्त्र विभागाचे अधीक्षक मिलनकुमार चावले यांनी दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामधील पर्यटन स्थळापैकी रात्री उशीरापर्यंत सुरू राहणारे एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे बीबी का मकबरा आहे. बीबी का मकबरा रात्री दहापर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो. मात्र, अंधारामध्ये हा बीबी का मकबरा स्पष्टपणे दिसत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन पुरातत्व शास्त्र विभागाचे अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी बीबी का मकबरा रात्री स्पष्टपणे दिसावा यासाठी लखलखत्या दिव्यांमध्ये मध्ये उजळण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

National tourism day : पर्यटनाची राजधानी पुन्हा बहरली, वाचा काय आहे पर्यटकांमध्ये लोकप्रिय

रात्रीच्या वेळी पर्यटकांना बीबी का मकबरा व्यवस्थित दिसावा. यासाठी लाखो रुपये खर्च करून संपूर्ण बीबी का मकबऱ्याला लाइटिंग बसवण्यात आली आहे. त्यासोबतच मकबऱ्यामध्ये असलेले फाउंटेन सुरू करण्यात येणार आहेत. हे फाउंटेन दोन प्रकारांमध्ये बनवण्यात आले आहेत. एक प्रकार छत्री सारखा तर दुसरा उंच उडणारा अशा दोन प्रकारांमध्ये हे फाउंटेन सुरू होणार आहेत. त्यासोबत या फाउंटेनच्या आजूबाजूला आकर्षक विद्युत  रोषणाई  लावण्यात येणार आहे.

बीबी का मकबरा परिसरामध्ये विद्युत रोषणाई करणार

महाराष्ट्रातील रात्री दहापर्यंत सुरू राहणारे एकच पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे बीबी का मकबरा. बीबी का मकबरा बघण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. अनेक वेळा त्यांना शहरात येण्यासाठी उशीर होतो रात्र होते. त्यामुळे त्यांना रात्री हा बीबी का मकबरा व्यवस्थित बघता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही बीबी का मकबरा परिसरामध्ये विद्युत रोषणाई करणार आहोत. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आहे याचे औचित्य साधून आम्ही याचं उद्घाटन करणार आहोत, असंही मिलनकुमार चावले यांनी सांगितलं.

First published:

Tags: Aurangabad, Local18