मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नामांतराची मागणी असूनही मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार का झाला? पाहा Video

नामांतराची मागणी असूनही मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार का झाला? पाहा Video

X
मराठवाडा

मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. या नामविस्ताराचा इतिहास माहिती आहे का?

Namantar Namvistar Andolan Diwas : मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराला 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. या नामविस्ताराचा इतिहास माहिती आहे का?

 • Local18
 • Last Updated :
 • Aurangabad [Aurangabad], India

  औरंगाबाद, 14 जानेवारी : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात 14 जानेवारी या दिवसाला मोठं महत्त्व आहे. याच दिवशी 1994 साली  मराठवाड्याचा नामविस्तार झाला. या विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. औरंगाबादमध्ये असलेल्या या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं या मागणीसाठी जवळपास दोन दशकांचा संघर्ष करावा लागला. अखेर 14 जानेवारी 1994 साली विद्यापीठाचा नामविस्तार झाला आणि या संघर्षाला पूर्णविराम मिळाला.

  बाबासाहेबांचं मराठवाड्याशी नातं

  राज्यातील मागास भागांमध्ये मराठवाड्याची आजही गणना होते. स्वातंत्र्यापूर्वी हा काळ निजामाच्या राजवटीमध्ये होते. निजामाच्या राजवटीत मराठवाड्यात शिक्षणाच्या फारशा सोयी नव्हत्या. येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादला जावं लागत असे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. मराठवाड्यात उच्च शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून मराठवाडा विद्यापीठाचं बाबासाहेब आंबेडकर असं नामांतर करावं अशी मागणी करण्यात येत होती.

  बाबासाहेबांचा एक निर्णय आणि मराठवाड्याची दूर झाली मोठी अडचण, पाहा Video

  नामांतर झाले पण...

  26 जून 1974 रोजी  मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र राहुल यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मागणी केली. तीन वर्षांनी दलित पँथरनं या मागणीला सार्वजनिक रुप दिलं. दलित पँथरच्या मागणीला सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीनं पाठिंबा दिला. त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यापीठ नामांतराची मागणी लावून धरली.

  त्याचवेळी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करणारा एक मोठा गट पुढे आला. हा गटही तितकाच आक्रमक होता. मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात नामांतर समर्थक आणि नामांतर विरोधक असे गट पडले. मराठवाड्यात दोन्ही गट आमने-सामने उभे टाकले होते. त्याचवेळी राज्याच्या राजकारणात उलाथपालथ झाली.

  शरद पवार 1978 साली काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रातील पहिल्या गैर काँग्रेसी सरकारनं नामांतराचा मुद्दा निकालात काढायचं ठरवलं. 27 जुलै 1978 रोजी शरद पवार सरकारनं नामांतराचा ठराव राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला.

  विधिमंडळात ठराव मंजूर होताच त्याचे मराठवाड्या तीव्र पडसाद उमटले. सर्वच जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात जातीव तणाव निर्माण झाला. त्यामधून दंगली पेटल्या आणि नामांतराचा हा प्रस्ताव सरकाराला स्थगित करावा लागला.

  बाबासाहेबांनी 71 वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्यानं लेखकाचं बदललं आयुष्य, Video

  अखेर नामविस्तार

  मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्नानं 1990 च्या दशकात पुन्हा डोकं वर काढलं. 1993 साली शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचं ठरवलं. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या नावावर ठाम होते. तर दुसरिकडं निजामशाही दडपण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ उभारलेल्या व्यक्तींचं मराठवाडा या नावाशी भावनिक कनेक्शन होतं.

  दोन्ही बाजूंचा आग्रह टोकाचा होता. त्यामुळे शरद पवार सरकारनं अखेर नामांतराच्या ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी दिली.

  First published:

  Tags: Aurangabad, Dr. Babasaheb Ambedkar, Local18, Marathwada, Sharad Pawar