औरंगाबाद, 6 डिसेंबर : किडनॅप झालेल्या मुलाची आमच्या विरुद्ध खोटी तक्रार का दिली, असे विचारले असता भांडण झाले. या भांडणांत डोक्यात दगडाने मारून, जबरदस्तीने औषध पाजत खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही धक्कादायक घटना कोपरावर शिवराई वाळूज गाव येथे घडली आहे. भांडण झाल्यानंतर आरोपींनी रमेश काळे यांना धरुन काहीतरी औषध पाजून तेथून पळून गेले. त्यानंतर रमेश काळे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना रमेश बबन काळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल 5 तारखेला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. रमेश बबन काळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपी रावसाहेब सिताराम काळे याची पत्नी सुनंदा रावसाहेब काळे हिने फिर्यादी पोपट नारायण पवार व त्याची पत्नी व मुलगा यांचे विरुद्ध मुलगा किडनॅप केल्याची केस केलेली आहे. यानंतर 5 रोजी सकाळी 10.00 वाजेच्या सुमारास आरोपी रावसाहेब सिताराम काळे याचा किडनॅप झालेला मुलगा हा सईदा भाभीच्या मळ्यात आल्याबाबत माहिती मिळाल्याने तेथे पोपट पवार, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश बबन काळे असे गेले. यावेळी तेथे किडनॅप झालेला मुलगा तेजवील हा असल्याने ‘मग खोटी केस का केली?’ असे विचारले असता त्यावेळेस तेजवील तेथून पळून गेला.
यानंतर आरोपींनी मंडळी जमून पोपट पवार, त्याची पत्नी व मेव्हणा रमेश काळे यांना खाली पाडून दगडाने लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच पोपट पवार यांच्या पत्नीस डोक्यास मार लागल्याने ती तेथून पळून गेली. आरोपी रमेश काळे यांना धरुन काहीतरी औषध पाजून तेथून पळून गेले. त्यानंतर तेथे फिर्यादीची पत्नी अश्विनी हिने रिक्षा आणून त्यामध्ये पोपट पवार व रमेश काळे यांना उपचार कामी घाटी दवाखाना येथे दाखल केले असता उपचारादरम्यान, रमेश बबन काळे यांचा मृत्यू झाल.
हेही वाचा - Aurangabad Crime : चारित्र्याचा संशय, भर चौकात पत्नीच्या डोक्यात घातले फावडे, औरंगाबादमधील घटना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Crime news, Murder news