मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad: भाकर मागताच संतापली सुन, रागाच्या भरात सासूचा मोडला हात, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

Aurangabad: भाकर मागताच संतापली सुन, रागाच्या भरात सासूचा मोडला हात, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनेने आपल्या सासू आणि पतीला मारहाण केली आहे.

औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनेने आपल्या सासू आणि पतीला मारहाण केली आहे.

औरंगाबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनेने आपल्या सासू आणि पतीला मारहाण केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

औरंगाबाद, 25 डिसेंबर : घरात किरकोळ कारणांवरुन वाद होतच असतात. पती आणि पत्नी यांच्यात जसे वाद (Husband and wife verbal clash) होत असतात त्याचप्रमाणे सासू आणि सुन यांच्यातही वाद होण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, औरंगाबादमध्ये एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. (Shocking news from Aurangabad)

सासूची बोटं मोडली

आपल्याला भूक लागल्याने सासूने सुनेकडे भाकर करुन देण्याची मागणी केली. यानंतर सुन इतकी संतापली की, तिने रागाच्या भरात सासूला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुनेने केलेल्या मारहाणीत सासूच्या हाताची बोटं मोडली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

सुनेच्या विरोधात तक्रार दाखल

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित सासूने आपल्या सुनेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी सांगितले की, भूक लागल्याने मी सुनेला भाकर करुन देण्याची मागणी केली. यावेळी सुनेने मला शिविगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत माझ्या हाताची बोटं मोडली.

वाचा : वेद शिकवणाऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत केले अनैसर्गिक कृत्य

संतापाच्या भरात पतीलाही मारहाण

पीडित सासूने आपल्या तक्रारीत म्हटलं, सुन मला मारहाण करत असताना माझ्या बचावासाठी मुलाने मध्यस्थी करत सुनेला मारहाण करण्यापासून रोखलं. यावेळी सुनेने माझ्या मुलालालाही मारहाण केली. या प्रकरणी पीडडित सासूच्या तक्रारीनंतर कन्नड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आळी असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रेम विवाहाची मोठी शिक्षा; आधी जावयाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि...

दिल्‍लीतील राजोरी गार्डन परिसरातील एका तरुणाचा प्रायवेट पार्ट कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या आणि अपहरण गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे.

गुरुवारी सफदरजंग रुग्णालयात जखमी अवस्थेत एक तरुण दाखल झाला होता. त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तरुणाच ही अवस्था केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. यामुळे कुटुंबीय नाराज होते. आधी त्यांनी जावयाचं अपहरण केलं, यानंतर त्याला मारहाणही केली. यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून सागरपूर भागात फेकून फरार झाले. सध्या तरुणाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्याची प्रकृती नाजूक आहे. पोलीस आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime