मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'10 लाख मागितले तर कोंबडा बनवेल' अघोरी विद्या असल्याचं सांगून फसवणूक, भोंदूला अटक

'10 लाख मागितले तर कोंबडा बनवेल' अघोरी विद्या असल्याचं सांगून फसवणूक, भोंदूला अटक

Crime in Aurangabad: तुमच्या घरात 96 किलो गुप्तधन (96 Kg secret wealth) असल्याचं सांगून एका भोंदूबाबाने औरंगाबादेतील एका तरुणाची तब्बल दहा लाखांची फसवणूक (10 Lakh money fraud) केली आहे.

औरंगाबाद, 12 डिसेंबर: तुमच्या घरात 96 किलो गुप्तधन (96 Kg secret wealth) असल्याचं सांगून एका भोंदूबाबाने औरंगाबादेतील एका तरुणाची तब्बल दहा लाखांची फसवणूक (10 Lakh money fraud) केली आहे. आरोपी भोंदूबाबाने घरात शांतता प्रस्थापित करणं आणि गुप्तधन शोधून काढण्याच्या नावाखाली फिर्यादीकडून वेळोवेळी 9 लाख 95 हजार रुपये उकळले आहेत. इतके पैसे देऊनही गुप्तधन न मिळाल्याने फिर्यादीने आरोपीकडे आपले पैसे परत मागितले. पण आरोपीनं 'माझ्याकडे अघोरी विद्या असून तुला कोंबडा बनवेल' अशी धमकी दिली (Threat to make cock) आहे. याप्रकरणी अखेर फिर्यादीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शेख रफत शेख करीम असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरात अशांतता होती. अगदी छोट्या छोट्या घरगुती कारणातून त्यांच्या घरात वाद होतं होते. त्यामुळे त्यांच्या एका मित्राने घरात शांती प्रस्थापित करण्यासाठी मानवत येथील सायलू महाराजांची भेट घेण्याचा सल्ला दिला. यामुळे फिर्यादी रफत त्यांची पत्नी आणि मित्र असे तिघेजण मानवत याठिकाणी महारांजी भेट घ्यायला गेले. पण यावेळी तिघांना सिताराम महाराज भेटला.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

आरोपी सिताराम याने 'तुमच्यावर करणी केली आहे' असं सांगत घरी येऊन पाहणी करावी लागेल, अशी भीती दाखवली. त्यासाठी 96 हजार रुपये मागितले. पैसे दिल्यानंतर आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने घरावर सापाचा साया आहे. तसेच घरात 96 किलो गुप्त धन असल्याचंही फिर्यादीला सांगितलं. संबंधित गुप्तधन मिळवून देण्यासाठी पूजा घालावी लागेल. असं सांगून आरोपीनं फिर्यादीकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरुपात 9 लाख 95 हजार रुपये लुटले आहे.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

गुप्तधन न मिळाल्याने फिर्यादीनं सीताराम महाराजांकडे आपल्या पैशांची मागणी केली. आरोपीनं पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच 'घटनेची वाच्यता केल्यास तुला कोंबडा बनवेल. माझ्याकडे अघोरी विद्या आहे', अशी भीती आरोपीनं फिर्यादीला दाखवली. या प्रकारानंतर अखेर रफत यांनी औरंगाबाद पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Aurangabad, Crime news