मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्राची डोकी का फिरवलीत? जातीपातीचं विष का पेरलं? राज ठाकरेंचा पवारांना सवाल

महाराष्ट्राची डोकी का फिरवलीत? जातीपातीचं विष का पेरलं? राज ठाकरेंचा पवारांना सवाल

"शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय", अशा शब्दांत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

"शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय", अशा शब्दांत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

"शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय", अशा शब्दांत राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.

  • Published by:  Chetan Patil

औरंगाबाद, 1 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी लेखक जेम्स लेनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांना अनेक प्रश्न विचारले. "तुमची केंद्रात सत्ता होती तेव्हा जेम्स लेनला का नाही आणलंत? महाराष्ट्राची का डोकी फिरवलीत? कशासाठी हे विष पाजलत? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते की नव्हते असा वाद उकरुन काढायचे. रामदास स्वामींकडे तुम्ही जातीय पाहणार? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराज शिष्य होते? किंवा शिवाजी महाराज रामदास स्वामी गुरु होते असे बोलले का? रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय त्यापेक्षा उत्कृष्ठ आजपर्यंत मी कुठेच वाचलेलं नाही", असं राज ठाकरे जाहीर सभेत म्हणाले.

"प्रत्येकवेळा बोलताना शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, हो शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच. पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव आलं नाही. शिवाजी महाराजांचा कधी फोटोही आधी नसायचा. जातीचं कालवलेलं विष हे शाळा-कॉलेजपर्यंत गेलं. तिथेही आता विचार करायला लागले. इथपर्यंत घाण राजकारण आणलं. आम्ही जातीतून बाहेर येत नाही, हिंदू कधी होणार, मराठी कधी होणार? आमच्याकडे जातीने विळखा घालून ठेवलाय", असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे शरद पवारांवर आणखी काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले की, आम्ही दोन समाजात दुही माजवत आहेत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी योग्य नाही. पवार साहेब आपण महाराष्ट्रात जाती-जातीत जे भेद निर्माण करत आहात त्याने जास्त दुही माजतेय. प्रत्येक व्यक्ती जातीत बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे ते बघून बोलायचं. मी त्यादिवशी जेव्हा बोललो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युट्यूबवरच्या सगळ्या सभा काढून बघा, त्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आता बोलायला सुरुवात झाली. मी बोलल्यानंतर सुरुवात झाली. काहीतरी व्हिडीओ काढत आहेत. तल्लीन झालेत आणि गीत रामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवाजी महाराजांचां पुस्तक ठेवलंय. कशाला खोटं दाखवताय?

('त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, नाहीतर महाराष्ट्रात काय घडेल...', सभेदरम्यान अजाणचा आवाज ऐकू येताच राज ठाकरे संतापले)

मी त्यादिवशी म्हटलं, शरद पवार हे नास्तिक आहेत. लागलं, झोंबलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. लगेच देवाचे सगळे फोटो काढले. पुजा करताना आणि नमस्कार करताना. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत, असं बोलली आहे. आता याहून अधिक काय पुरावा देऊ? जिकडे सभा घेतायत तिथे बोलत आहेत की, राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत म्हणून. मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी तुम्ही वाचल्या आहेत. आख्खी पुस्तकं संदर्भासहीत वाचा म्हणजे तुम्हाला कळेल.

माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो. त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षूकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं. महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरु करणारे माझे आजोबा होते.

जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरु झाला. मराठा बांधवाची माथी भडकवायची. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढलं. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत.

First published: