मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले, स्वागतासाठी उभे असलेले मनसैनिक हिरमुसले

अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले, स्वागतासाठी उभे असलेले मनसैनिक हिरमुसले

'...नाहीतर मी राजकारणात आलो नसतो', अमित ठाकरे यांचं मोठ विधान

'...नाहीतर मी राजकारणात आलो नसतो', अमित ठाकरे यांचं मोठ विधान

अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात बाबा पट्रोल पंपावर हजर होते.

औरंगाबाद, 29 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मोठा कार्यक्रम आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मनसेचे सर्व दिग्गज नेते आता औरंगाबादच्या दिशेला रवाना होत आहेत. राज ठाकरे स्वत: उद्या औरंगाबादला जाणार आहेत. ते आज पुणे दौऱ्यावर आहेत. तर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सभेची तयारी करण्यासाठी आज औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. पण ते दाखल झाले तेव्हा एक विचित्र घटना घडली. अमित ठाकरे औरंगाबादमध्ये रस्ता चुकले. त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात बाबा पट्रोल पंपवर हजर होते. कार्यकर्त्यांची मोठी संख्या होती. पण अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपावर न पोहोचता ते त्यांच्या औरंगाबाद येथील मुक्काम स्थळी पोहोचले. त्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले. अमित ठाकरेंकडून GPS मुळे गडबड झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. ते कोणत्याही शहराच्या दौऱ्याला गेले की त्यांच्याअवतीभोवती कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा असतो. राज ठाकरे यांच्याबाबत तरुणांमध्ये विशेष आकर्षण आहे. राज यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांचं धडाकेबाज भाषण अनेकांना प्रचंड आवडतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्याबाबत प्रचंड आदर आहे. राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आल्याने औरंगाबादमधील मनसे कार्यकर्तेही प्रचंड उत्साही आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे स्वत: औरंगाबादमध्ये येणार म्हणून कार्यकर्ते उत्साहात होते. अमित ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते बाबा पेट्रोल पंप येथे जमले होते. पण GPS च्या चुकीमुळे अनपेक्षित घडलं. अमित ठाकरे बाबा पेट्रोल पंपवर न पोहोचता त्यांना आज जिथे मुक्काम करायचा आहे त्याठिकाणी पोहोचले.

('बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? भाजप प्रवक्त्यांवर तुटून पडा', मुख्यमंत्र्यांचा शिवसेना प्रवक्त्यांना कानमंत्र)

राज ठाकरेंच्या सभेसाठी 16 अटी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी पोलिसांनी 16 अटी-शर्तींच्या आधारावर परवानगी दिली आहे. यापैकी दहा महत्त्वाच्या अटींविषयी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्या पुढीलप्रमाणे :

1) सभास्थळी आसनमर्यादा ही 15 हजार इतकी आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरलं जाईल.

2) सभेदरम्यान कोणत्याही वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळथ असणाऱ्या प्रथा/परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही, त्याविरुद्ध चिथावणी दिली जाणार नाही, अशी कृती, वक्तव्ये, घोषणाबाजी कुणीही करणार नाही. याबाबत आयोजक आणि वक्त्यांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.

3) सभा ही 1 मे रोजी संध्याकाळी साडेचार ते रात्री पावणे दहा वाजेच्या वेळेत आयोजित करण्यात यावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळत कोणताही बदल करण्यात येऊ नये.

4) सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेत येताना किंवा जाताना कुणीही आक्षेपार्ह विधान, वर्तवणूक, घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करनार नाही, याची दक्षता घ्यावी.

5) सभेला येणाऱ्या वाहनांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा, मार्ग न बदलण्याच्या सूचना द्याव्या. वाहनांनी शहरात आणि इतर ठिकाणी वेगमर्यादाचे पालन करावे. सभेसाठी येताना-जाताना कार किंवा बाईक रॅली काढू नये.

6) कार्यक्रमवेळी कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये आणि त्यांचं प्रदर्शन करु नये.

7) स्वयंसेवक नेमण्यात यावे. त्यांची नावे, मोबाईल नंबर पोलिसांना द्यावे. तसेच कोणत्या गावातून किती नागरीक येणार, त्यांची संख्या आणि त्यांच्या वाहनांचा प्रवासाचा मार्ग विषयी माहिती पोलिसांना द्यावी.

8) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आवाजाची मर्यादा असावी. त्या नियमांचा भंग केल्यास 5 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडांची शिक्षा होऊ शकते.

9) सभेदरम्यान बस, मेडिकल, वीज, रुग्णवाहिका अशा इत्यादी अत्यावश्यक सेवांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.

10) सभेसाठी येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहची व्यवस्था करावी.

First published: