Home /News /maharashtra /

EXCLUSIVE: विजयानंतर आमदार संजय सिरसाट यांच्या पत्नीला अश्रू अनावर, पाहा Video

EXCLUSIVE: विजयानंतर आमदार संजय सिरसाट यांच्या पत्नीला अश्रू अनावर, पाहा Video

आम्ही जनतेची कामे करण्यासाठी बांधील आहोत आणि त्या जोरावर लोकांनी आमदार शिरसाट यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिंदे गटाला बळ दिल्याचे त्यांनी सांगितले.

    औरंगाबाद, 05 ऑगस्ट : शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये शिंदे गटाने ग्रामपंचायती निवडणुकीत बाजी मारली आहे. आमदार संजय सिरसाट यांनी 17 पैकी 5 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. संदीपान भुमरे यांनीही 7 पैकी 6 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. सिल्लोडमध्येही अब्दुल सत्तार यांनी 3 पैकी 2 ग्रामपंचायत ताब्यात घेऊन शिंदे गटाचा वरचष्मा दाखवून दिला आहे. या विजयानंतर संजय सिरसाट यांच्या पत्नी भावनिक झाल्या होत्या. निकाल ऐकून त्यांना रडू कोसळले. निष्ठावान आमदार संजय सिरसाट यांना लोकांनी पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असेही त्यांनी सांगितले. मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला, जनतेने दाखवून दिलं आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहोत. शिंदे गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदाच झालेली ही निवडणूक असल्याने अनेकांच्या नजरा इकडे लागल्या होत्या. आम्ही जनतेची कामे करण्यासाठी बांधील आहोत आणि त्या जोरावर लोकांनी शिरसाट यांच्यावर विश्वास दाखवून शिंदे गटाला बळ दिल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या मतांची मोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्वच ठिकाणी शिवसेना आणि शिंदे गट अशीच चुरस होती. या चुरसीच्या लढतीत बंडखोर आमदारांनीच शिवसेनेला झटका देत वर्चस्व सिद्ध केले आहे. दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाला निवडणुकीत जनाधार मिळणार नाही, अशी टीका केली जात होती. मात्र, ग्रामपंचायत स्तरावरही शिंदे गट शिवसेनेला भारी ठरत आहे. त्यामुळे शिवसेनेची आणखी गोची होण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या