औरंगाबाद, 04 डिसेंबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने आपल्या आयुष्याचा शेवट (Farmer Couple Commits Suicide) केला आहे. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पत्नीनं घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Jump into well and suicide) केल्यानंतर, अवघ्या अर्ध्या तासात पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकाच दिवशी शेतकरी दाम्पत्याने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने त्यांची त्यांची दोन्ही मुलं पोरकी झाली आहे. आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदानंद गुलाबराव गव्हाणे (39) आणि ज्योती सदानंद गव्हाणे (32) असं आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे. ते सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील रहिवासी होते. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेला दुष्काळ आणि ओला दुष्काळामुळे शेतीत झालेलं नुकसान आणि नापिकीला कंटाळून दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
हेही वाचा-पती-पत्नीचे ऑफिसमध्ये मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती यांनी शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घराशेजारील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केली होती. या घटनेला काही मिनिटेच उलटली, तोपर्यंत व्ह्यू पॉइंट रस्त्यालगत असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाला सदानंद यांनी गळफास घेतला आहे. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस करत आहेत.
हेही वाचा-खेळ पडला भलताच महागात; मित्राने ब्लेडने कापला मुलाचा प्रायव्हेट पार्ट अन्...
अवघ्या तीस मिनिटांच्या आत आई आणि वडिलांनी अशाप्रकारे हृदयद्रावक शेवट केल्याने या दाम्पत्याची दोन अल्पवयीन मुलं पोरकी झाली आहे. मृत दाम्पत्याला एक 13 वर्षीय मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी आहे. अचानक आई वडिलाचं छत्र हरवल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Suicide