औरंगाबाद 23 जानेवारी : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस आहोत. आजपासून औरंगाबादमध्ये ठाकरे गट रिकामा होण्यास सुरुवात होणार आहे. तो पूर्णपणे रिकामा होणार आहे. कारण तिथे लोक राहण्यास तयार नसल्याची टीका संदीपान भूमरे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले भूमरे?
संदीपान भूमरे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस आहोत. आजपासून औरंगाबादमध्ये ठाकरे गट रिकामा होण्यास सुरुवात होणार आहे. असं संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांना देखील टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे हे काहीच कामाचे नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांना शिंदे गटात देखील घेणार नाहीत, असं संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंचं बाळासाहेबांना अभिवादन
दुसरीकडे भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांना अभिवादन करताना नारायण राणे भावूक झाले. अखेरच्या दिवसांमध्ये बाळासाहेबांची भेट होऊ शकली नाही म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेनेतील कही लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.