मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाडा मुक्ती दिनी शाळेत करण्यासाठी 'हे' घ्या भाषण, सर्वांवर पडेल तुमचा प्रभाव

मराठवाडा मुक्ती दिनी शाळेत करण्यासाठी 'हे' घ्या भाषण, सर्वांवर पडेल तुमचा प्रभाव

निजामशाहीच्या राजवटीतून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला.  तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

निजामशाहीच्या राजवटीतून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

निजामशाहीच्या राजवटीतून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

  • Published by:  Onkar Danke
मुंबई, 16 सप्टेंबर :  देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी नुकताच साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र झाला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरानी निजामशाहीच्या राजवटीमधील नागरिक स्वतंत्र झाले. तत्कालीन निजामशीच्या राजवटीमध्ये तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग आणि महाराष्ट्रातील मराठवाड्याचा समावेश होता. निजामशाहीच्या राजवटीतून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला.  तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आता शनिवारी 74 वा मराठवाडा मुक्ती दिन साजरा होणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला आता सुरूवात होत आहे. या निमित्तानं  शनिवारी राज्यातील सर्व शाळांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेषत: मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळांसाठी तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेत भाषण करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सभेला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ, आदरणीय मुख्याध्यापक आणि माझे सर्व शिक्षक तसंच मित्र मैत्रिणींनो. आज 17 सप्टेंबर आपल्या मराठवाड्याचा मुक्ती दिन. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण सर्वांनी नुकताच साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला हे सर्वांनाच माहिती आहे. देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपला मराठवाडा त्या दिवशी पारतंत्र्यातच होता. मराठवाडा मुक्ती दिन: स्मारक दुरूस्तीचे 72 कोटी अद्याप कागदावरच! शिंदे सरकारवर गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशीव हे मराठवाड्यातील आठ जिल्हे तेव्हा निजामाच्या राजवटीमध्ये होते. निजाम तत्कालीन भारतामधील सर्वात बलाढ्य संस्थानिक होता. मराठवाड्यासह सध्याचं तेलंगणा राज्य आणि कर्नाटकमधील काही भाग निजामाच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा लढा उभारला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्त्वाखाली लढा उभारला. मराठवाड्याच्या गावागावात हा स्वातंत्र्य लढा लढला गेला. प्रत्येक गावामधून स्वातंत्र्य सैनिक पुढे आले. त्यांनी प्राणांची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केलं. संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांची भारत देशामध्ये विलिन होण्याची इच्छा होती. 'मराठवाडा मुक्ती संग्राम'वरून राजकीय नाट्य, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम बदलला मराठवाड्यातील नागरिकांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता. ' आम्हाला भारतामध्ये विलिन करा' ही एकच मागणी त्यांची निजामाकडे होते.  पण, निजामाला ही मागणी मान्य नव्हती. निजामाचा सेनापती कासिम रिझवी याने मुस्लीम स्वयंसेवकांची मोठया प्रमाणात सैन्यात भरती केली. त्याने उभारलेले सैन्य हे रझाकार म्हणून ओळखले जात असे. संपूर्ण मराठवाड्यात या रझाकारांची दहशत होती. या रझाकारांनी नागरिकांवर असंख्य अत्याचार केले. मराठवाड्यातील एकही जिल्हा, जिल्ह्यातील कोणतेही गाव त्यांच्या तावडीतून सुटले नाही. या रझाकारांच्या जीवावर स्वतंत्र देश तयार करण्याची निजामाची महत्त्वकांक्षा होती. निजामाची ही फुटीर वृत्ती भारत सरकारला मान्य नव्हती.देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलिनिकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी निजामाशी सुरूवातीला चर्चा करत हा प्रश्न शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, निजामाला हे मान्य नव्हते. चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारनं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सरदार वल्लभाई पटेलांनी निजामाच्या विरोधात 'पोलीस अ‍ॅक्शन' ची घोषणा केली. भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे निजामाच्या रझाकारांनी गुडघे टेकले. मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. मराठ्यावाचे नागरिक आता भारताचे नागरिक बनले. निजामाची जुलमी राजवट उलथवून स्वातंत्र्याची नवपहाट आणण्यासाठी ज्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांचे आयुष्य वेचले त्या सर्वांना माझे शत शत नमन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद! जय महाराष्ट्र! भारत माता की जय!
First published:

Tags: Marathwada

पुढील बातम्या