औरंगाबाद, 07 डिसेंबर : भीषण अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झालेल्या महेंद्र पाटील याला दोन महिने कोमात राहावं लागलं. यामुळे तो जिवंत राहील की नाही याबाबत शंका असताना त्याने या परिस्थितीवर मात केली. आता त्याला पूर्वीसारखं चालता बोलता येत आहे. या सोबतच त्याने दीडशे पानांचे पुस्तक पाठ केले असून 100 पेक्षा अधिक मोबाईल क्रमांकही त्याच्या तोंडी पाठ आहेत. यामुळे औरंगाबाद शहरातील चालती बोलती फोन डिरेक्टरी म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवपिंपरी या गावचे पाटील कुटुंबीय. महेंद्र याचे वडील खाजगी डॉक्टर असल्याने त्यांच्या नोकरीनिमित्त पाटील कुटुंबीयांना 28 वर्षापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात स्थायिक व्हावं लागलं. महेंद्रचे वडील अरुण हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये खाजगी पद्धतीने नोकरी करत आहे. डॉ.अरुण पाटील यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तीनही मुलींचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी त्यांचे विवाह करून दिले. महेंद्र याने दहावी मध्ये चांगले गुण मिळवत तंत्रनिकेतन मध्ये आपली जागा निश्चित केली.
सर्वांचा विरोध होता पण... किडनी देऊन पतीला वाचवणाऱ्या पत्नीनं सांगितली इमोशनल स्टोरी, Video
त्यानंतर त्याने डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीसाठी नांदेड येथील एमजीएम महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तीनही वर्षांमध्ये त्याने प्रत्येक विषयात चांगले गुण मिळवत भविष्याची प्लॅनिंग केली होती. तिसऱ्या वर्षाच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी मित्रांसोबत राहात असलेल्या खोलीवर जात असताना अचानक भरगाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे महेंद्र थेट दुभाजकावर जाऊन कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे भीषण अपघात बघितलेल्या प्रत्यक्ष दर्शनीनी महेंद्र जिवंत राहील याबाबत शंका व्यक्त केली होती.
महेंद्र याला नांदेड येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून सिरीयस असल्यामुळे इतर रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला त्याच्या वडिलांना दिला. नांदेडला खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये तो दोन महिने कोमामध्ये होता. दरम्यान त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे डोळे उघडले आणि तो बोलू लागला. दरम्यान त्याला घरी आणले आणि त्याच्यावरती फिजिओथेरपी करून त्याला बोलायला व चालायला त्याच्या घरच्यांनी प्रोत्साहित केलं.
Video : अपंगत्व, स्पर्धा परीक्षेतील अपयश बाजूला करत उभारला व्यवसाय, इतरांनाही देतोय रोजगार
दीडशे पानाचं पुस्तक मुखपाठ
महेंद्र पूर्वीसारखा होईल का याबाबत शंका होती. सोबतच त्याला पूर्वीचं काही आठवेल का याबाबतही डॉक्टरांना शंका असताना या परिस्थितीवर त्यांनी मात केली. सध्या मी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत आहे. या ठिकाणी काम करत असताना मला सध्या 100 पेक्षा अधिक मोबाईल क्रमांक पाठ आहेत. सोबत मी स्वामी चरित्र हे दीडशे पानांचे पुस्तकही मुखपाठ केले आहे. या पुस्तकातील कुठलाही पान क्रमांक मला विचारला तर तो मजकूर काय आहे हे मुखपाट तोंडी पद्धतीने सांगतो, असं महेंद्र पाटील सांगतो.
अचानक अपघात झाल्यामुळे आमचं स्वप्न भंगल
महिंद्र लहानपणापासूनच हुशार होता. त्यामुळे त्याने अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवावी असं आमचं आणि त्याचं स्वप्न होतं. मात्र अचानक अपघात झाल्यामुळे आमचं स्वप्न भंगल. अपघातानंतर कठीण शस्त्रक्रियेवरती मात करत आता तो पूर्ववत झाला आहे. सध्या तो महानगरपालिकेत खाजगी पद्धतीने नोकरी करत आहे. आमच्या मुलाला पुनर्जन्म मिळाल्याचा आनंद असल्याचं त्याचे वडील डॉ.अरुण पाटील सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Aurangabad, Aurangabad News, Local18