छत्रपती संभाजीनगर, 11 मार्च : महाविकास आघाडीने राज्य सरकार, केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची रणनीती तयार केली आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकांचे नियोजन करण्यासाठी 15 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. यासोबत छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची विराट सभा शहरात होणार आहे.
2 एप्रिलला महाविकास आघाडीची विराट सभा
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची विराट सभा होत आहे. पुढील महिन्यात 2 एप्रिलला या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते सभेत उपस्थित राहणार आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या मैदानावर सभा गाजल्या. त्याच छत्रपती संभाजीनगर येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
वाचा - राज ठाकरे यांच्या खास माणसाला मनसैनिक वैतागले, नवी मुंबईत मोठे खिंडार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सभा :
महाविकास आघाडी कडून होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभांचा आयोजन करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि नागपूर अशा सात शहरांमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आलेल आहे. दोन एप्रिल पासून 11 जून पर्यंत या सभांचा सपाटा सुरू होणार असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचा आवाज बुलंद होणार आहे.
असे असणार सभांचे नियोजन :
दोन एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथील पहिली सभा, 16 एप्रिलला दुसरी सभा नागपूरला, 1मे तिसरी सभा मुंबईत होणार, 14 मेला पुणे येथे चौथी सभा, 28 मे ला पाचवी सभा कोल्हापूरला, 3 जुनला नाशिकमध्ये सहावी सभा तर 11 जुन आमरावती सातवी सभा होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.