मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण, रस्त्याची तक्रार केल्याने मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

मंत्री संदिपान भुमरे यांच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण, रस्त्याची तक्रार केल्याने मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या भावाची भाईगिरी, तरुणाला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या भावाची भाईगिरी, तरुणाला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद

Maharashtra Thackeray Government ministers brother beats a youth : रस्त्याची तक्रार केल्याच्या रागातून एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या भावाने ही मारहाण केली आहे.

औरंगाबाद, 9 डिसेंबर : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संदिपान भुमरे (Minister Sandipan Bhumare) यांच्या भावाने एका तरुणाला मारहाण (youth beaten) केल्याचा प्रकार समोर आला आहे. संदिपान भुमरे यांचा भाऊ राजू भुमरे यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. लाकडी दांड्याने राजू भुमरे (Raju Bhumare) यांनी मारहाण केली आहे. मारहाण करत असतानाचा एक फोटोही समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे.

औरंगाबादमधील रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत रणजीत नरवडे हा कार्यकर्ता फेसबूक लाईव्ह करत होता. याचाच राग धरुन मंत्री संदिपान भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे याला बेदम मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे. रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी येत असातनाच रणझीत नरवडे हा फेसबूक लाईव्ह करत होता यावेळी राजू भूमरे यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर रणजीत नरवडे याने पाचोड पोलीस ठाण्यात राजू भुमरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

वाचा : नामांकित दुधात अस्वच्छ पाण्याची भेसळ, मुंबई पोलिसांनी छापा टाकत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रणजित नरवडे असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. बोगस रस्ता प्रकरणात रणजीत नरवडे याने तक्रार केली होती. 2018 साली रस्ता न बनवता बोगस बिल उचललं असल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारीनंतर घाई गडबडीत रस्त्याचे काम सुरू केलं होतं. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रणजित नरवडे याने केला आहे. बोगस बिले काढून गैरव्यवहार होत असल्याचंही त्याने म्हटलं होतं. या प्रकरणी रणजित नरवडे याने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती.

नरवडे हा संदिपान भुमरे यांच्या सख्ख्या मामाचा मुलगा

मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रणजित नरवडे असे आहे. रणजित नरवडे हा संदिपान भुमरे यांच्या सख्ख्या मामाचा मुलगा आहे. असे असतानाही संदिपान भूमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी रणजित नरवडे याला मारहाण केली आहे.

वाचा : अचानक इंजिनचा आवाज बंद झाला अन्..; CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा पहिला LIVE VIDEO

पूर्वनियोजित कट रचून मारहाणीचा आरोप

या प्रकरणी रणजित नरवडे यांनी पोलिसांना पत्र लिहून म्हटलं, पूर्वनियोजित कटरचून मला अश्लील भाषेत शिवीगाळ करुन तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रस्त्याच्या बोगस कामाचे फेसबूक लाईव्ह करत असताना तेथे राजू भुमरे, शिवराज राजू भूमरे, दत्ता कचरू भुमरे, दत्ता गोरख भुमरे, दिगंबर भुमरे, अमोल रामेश्वर भुमरे, राम विश्वनाथ भुमरे आणि अप्पा साबळकर हे आले. यावेळी राजू भुमरे आणि शिवराज भुमरे यांनी लाकडी दांडक्याने मला मारहाण केली.

First published:

Tags: Aurangabad, Crime, Shiv sena