मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

निवडणुकीआधीच युतीत ठिणगी? शिंदेंचा मंत्री म्हणतो भाजपसोबत युती नको!

निवडणुकीआधीच युतीत ठिणगी? शिंदेंचा मंत्री म्हणतो भाजपसोबत युती नको!

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, तसंच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Shreyas

औरंगाबाद, 30 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं, तसंच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचसोबत आगामी निवडणुकाही भाजपसोबत युती म्हणूनच लढल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकीकडे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते युती निश्चित असल्याचं बोलत असले तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. सिल्लोड मतदारसंघात येणाऱ्या निवडणुका भाजप आणि शिंदे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे, असं सत्तार म्हणाले आहेत.

सिल्लोडमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत, भाजपचे फक्त 2 आहेत, मग भाजपला जास्त जागा कशा द्यायच्या? अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे. एकत्र लढलो तर भाजप आणि शिंदे गटात संघर्ष होईल, म्हणून मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी भावना आहे, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.

सिल्लोडमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होऊ द्या, सगळ्या निवडणुकींतनंतर सत्तेत शिंदे गट आणि भाजपच राहील, असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

मला पालकमंत्री केलं नाही, म्हणून मी नाराज नाही. मीच एकनाथ शिंदेंना भुमरेंच्या नावाची शिफारस केली होती. आता भुमरे येणाऱ्या काळात जसे काम करतील, तसे त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

First published:

Tags: BJP, Cm eknath shinde, Shivsena