मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Raj Thackeray: "पेपर फोडणारे अद्याप फुटले नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात"

Raj Thackeray: "पेपर फोडणारे अद्याप फुटले नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात"

Raj Thackeray on Maharashtra government job exam paper leak cae: आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray on Maharashtra government job exam paper leak cae: आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raj Thackeray on Maharashtra government job exam paper leak cae: आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेचे पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद, 14 डिसेंबर : राज्यात गेल्या दोन महिन्यांत सरकारी विभागातील भरती प्रक्रियेचे पेपर फुटल्याचं समोर आंल. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोगींना अटक केली असतानाच म्हाडा विभागातील पेपर लीक (MHADA recruitment exam paper leak) झाल्याचं समोर आलं. या प्रकरणातही तीन आरोपींना अटक केली आहे. या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पेपर फुटी प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारण्यात आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (MNS Chief Raj Thackeray reaction on Government job exam paper leak)

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर (Raj Thackeray Aurangabad tour) आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, कसं आहे की पेपर काही पहिल्यांदाच फुटलाय असं नाहीये. आतापर्यंत अनेकदा फुटला आहे पेपर. पण ज्याने पेपर फोडला ते फुटले जात नाहीत म्हणून पेपर सारखे फुटतात. ज्या प्रकारचा वचक शासन म्हणून असायला हवा तो राहत नाहीये.

वाचा : 15 लाखांसाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानेच फोडला आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर

काय आहे पेपर लीक प्रकरण?

31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील गड ड संवर्गातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षा पार पडली. पण, पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस स्टेशनमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणी आता पर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडा परीक्षेचा भांडाफोड; मोठे मासे गळाला, पुण्यातून तीन आरोपींना अटक

रविवारी (12 डिसेंबर) म्हाडाचा पेपर होणार होता. मात्र पेपर फुटल्याचा संशय आल्यानंतर हा पेपर रद्द करण्यात आला. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन एजंट बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही केली असून मोठे मासे गळाला लागले आहेत.

जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक प्रितीश देशमुख, एजंट संतोष हरकळ आणि एजंट अंकुश हरकळ अशी आरोपींची नावं आहेत. हे आरोपी म्हाडा परीक्षेचा पेपर फोडायच्या तयारीत होते. मात्र विश्रांतवाडीतून रात्री दहा वाजता त्यांना ताब्यात घेतलं.

First published:

Tags: Aurangabad, MNS, Raj Thackeray