उस्मानाबाद :
- तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरण, उद्या तुळजापूर बंदची हाक
- जिल्हाधिकारी, मंदीर व्यवस्थापक आणि तहसीलदार यांच्या कारवाईच्या मागणीसाठी उद्या तुळजापूर शहर बंद राहणार
- सकल मराठा समाज व तुळजापूरकर यांच्या बैठकीत झाला निर्णय
- छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त
- तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले
- महाराज यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्ध गाभाऱ्यात सोडले नाही
- छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात
- शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त
- तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम