औरंगाबाद, 3 ऑगस्ट : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबत जातोय. त्यामुळे लोकांची काम रखडली आहेत. म्हणून औरंगाबाद शहरातील दोन तरुणांनी अजब घोषणा आणि मागणी केलीय. एका तरुणाने स्वतःला सामाजिक न्यायमंत्री म्हणून स्वतःच घोषित केलंय तर एकाने चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निवेदन देऊन सरकार स्थापन होईपर्यंत आपली शिक्षण मंत्री म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.
संतोषकुमार मगर हे औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिक्षण विभागाला मंत्री नसल्याने शिक्षण संबंधी विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न रखडले आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी आपल्याला दिली तर आपण लोकांचे काम करू असे त्याने निवेदनात म्हटले आहे.
पेशाने वकील असणारा दुसरा युवक भरत फुलारे यांनी तर स्वतःला सामाजिक न्याय मंत्री घोषित केले आहे. आपल्या कार्यालयाच्या दारावर त्यांनी तसा फलकही लावला आहे. एवढंच नाही तर त्यांनी नागरिकांचे निवेदनही स्वीकारली आहेत. फुलारे यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण नागरिक म्हणून कटिबद्ध आहोत. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आपल्यावर सामाजिक न्यायमंत्री पदाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपल्यावर कुणी लादली नाही तर आपण स्वतः घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
(महाविकास आघाडीला पुन्हा धोबीपछाड, शिंदे सरकारचा प्रभाग रचनांबाबत मोठा निर्णय)
भरत फुलारे हे भारतातील एकमेव पत्नी पीडित पुरुष संघटनेचे संस्थापक आहेत. या संघटनेच्या माध्यमातून ते पत्नीने अत्याचार केलेल्या पुरुषांची केस कोर्टात लढवण्याची जबाबदारी घेतात. घरातून बाहेर पत्नीने काढलेल्या पुरुषांसाठी त्यांनी आश्रम सुद्धा काढलेला आहे. या आश्रमात पत्नी पीडित अनेक पुरुष वास्तव्यास आहेत.
राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करणे हा राजकीय प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निवड्यानुसार त्याचे परिणाम मंत्रिमंडळ विस्तारावर होतील. काही काळ हा प्रश्न राहील. राज्यात लवकरच त्या त्या खात्याला मंत्री मिळतील आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा होईल.
संतोषकुमार आणि भरत यांच्या कृतीला आपण विनोदाने घेतले तरी राज्यात अनेक खात्याला मंत्री नसल्याने नागरिकांच्या तक्रारींचं निरसन होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा करूया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.