मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादच्या न्यायाधीशांनी चक्क पार्किंमध्ये केला निवाडा! वाचा नेमकं काय घडलं?

औरंगाबादच्या न्यायाधीशांनी चक्क पार्किंमध्ये केला निवाडा! वाचा नेमकं काय घडलं?

औरंगाबाद मध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद मध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद मध्ये प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 19 नोव्हेंबर : कंपनीत काम करताना मरण पावलेल्या मुलाच्या वृद्ध माता-पित्यांनी भरपाई मिळण्यासाठी 10 वर्षे कामगार न्यायालयात चकरा मारल्या. औरंगाबाद मध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हे प्रकरण आले होते. मात्र, सुनावणी तिसऱ्या मजल्यावर होती. 80 हून अधिक वय असलेल्या माता-पित्यांना वर चढणे शक्य नव्हते. हे लक्षात येताच न्यायाधीशांनी स्वत: खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या वृद्धांची बाजू ऐकून घेतली आणि तडजोडीअंती त्यांना 9 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले. या रकमेचा धनादेश लगेचच दांपत्याना देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्या वतीने प्रलंबित आणि वादपूर्व  प्रकरणात राष्ट्रीय लोकअदालतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या आदालतीमध्ये मोटार अपघात, धनादेश अनादर प्रकरणे, वीजचोरी, भूसंपादन इत्यादी दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवली होती. विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बँकांचा समावेश होता. विविध वित्तीय संस्था, विमा कंपन्या मध्यस्थ केंद्रातील वादपूर्व प्रकरणे आदींवर सुनावणी झाली.

महिलांप्रमाणे पुरुषांवरही होतात अत्याचार! पाहा काय आहे 'त्यांची' मागणी, Video

अजंठा येथील रहिवासी रफिक खान नवाज खान पठाण खोपोली येथील सीमेस्टिक कंपनीमध्ये काम करत असताना त्याचा मृत्यू झाला. काम करत असताना मृत्यू झाल्यामुळे कंपनीतील अपघात म्हणून त्यांना 3 लाख रुपये आर्थिक मदत दिली. मात्र, घरातील करता मुलगा,वडील, आई, पत्नी आणि तीन मुले असा परिवार सोडून गेल्यामुळे ही तुटपुंजी आर्थिक मदत कमी असल्यामुळे कुटुंबीयांनी न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणाचा खटला गेल्या 10 वर्षांपासून सुरू होता. कंपनीच्या वतीने अॅड  मंगेश मेने यांनी हे प्रकरण लोकआदलती मध्ये दाखल केले.

लोकआदलती मध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार असल्यामुळे रफिक याचे वृद्ध माता - पिता न्याय मिळण्याच्या अपेक्षेने आले होते. मात्र, वडिल 85 वर्षाचे असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावर सुनावणी होणाऱ्या ठिकाणी त्यांना जाणे शक्य नव्हतं. यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश के एन शर्मा, पॅनल सदस्य एडवोकेट सचिन गंडले, एडवोकेट विनोद पवार यांनी खाली उतरत पार्किंगमध्ये बसलेल्या रफिकच्या वृद्ध माता - पित्यांची बाजू ऐकून घेत तडजोडी अंत 9 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. दरम्यान आदेशानुसार कंपनीने रफिकच्या वृद्ध मात्या- पित्यांच्या हातामध्ये धनादेश दिला.

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहतायं? पाहा काय सांगतो कायदा, Video

10 वर्षाच्या न्यायालयीन लढाईत यश

गेल्या 10 वर्षापासून न्यायासाठी झटत असलेल्या रफिकच्या वृद्ध मात्या- पित्यांना थेट पार्किंग मध्ये येऊन त्यांची बाजू समजून घेत तडजोडी आणि त्यांना न्याय मिळवून दिल्यामुळे या निर्णयामुळे ते भारावून गेले होते. पैसे मिळाल्याचा आनंद त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता. यावेळी परिसरात दमलेल्या नागरिकांमध्ये देखील या निर्णयाचं कौतुक करण्यात आलं.

First published:

Tags: Aurangabad News, Court, Local18