Home /News /maharashtra /

WORLD SCHIZOPHRENIA DAY: स्किझोफ्रेनिया आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी तयार केल्या आकर्षक वस्तू पाहून व्हाल थक्क VIDEO

WORLD SCHIZOPHRENIA DAY: स्किझोफ्रेनिया आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी तयार केल्या आकर्षक वस्तू पाहून व्हाल थक्क VIDEO

(जागतिक

(जागतिक स्किझोफ्रेनिया दिन विशेष)

World Schizophrenia Day: 24 May रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस साजरा होतो. औरंगाबादेतल्या एका प्रदर्शनात मानसिक आजारातून उठवलेल्या व्यक्तींनी केलेल्या वस्तू ठेवल्या आहेत. त्यांची कलात्मकता पाहून थक्क व्हाल. पाहा VIDEO

    औरंगाबाद, 23 मे: स्किझोफ्रेनिया किंवा दुभंग व्यक्तिमत्त्व या मानसिक आजाराबद्दल अजूनही अनेक गैरसमजुती आहेत. या मानसिक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले आणि आधार मिळाला तर ते काय जादू करू शकतात, हे या VIDEO मधून दिसेल. स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त (World Schizophrenia Day 24 May)  24 मे रोजी  औरंगाबादमधल्या कांचनवाडी येथील शांती नर्सिंग होमतर्फे प्रोझोन मॉल येथे रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या आजारातून बरे झालेले रुग्णांनी आकर्षक वस्तू तयार केले आहेत. ज्यामध्ये पेंटिंग, हाताने तयार केलेल्या बाहुल्या, दागिने यासोबत विविध वस्तूंचा समावेश आहे. स्किझोफ्रेनिया या आजारातील रुग्णांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शांती नर्सिंग होम तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. रुग्णांनी तयार केलेल्या या वस्तूंना नागरिकांनी पसंती दिली. असून शांती नर्सिंग होम तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. शांती नर्सिंग होम येथील पुनर्वसन केंद्रात स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. पुनर्वसन केंद्रात रुग्ण विविध वस्तू तयार करतात. या रुग्णांनी तयार केलेली चित्रे, वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. बाहुल्या, कलात्मक वस्तू, कलाकुसर हे पाहून थक्क व्हाल. इतकी कलात्मक मानसिकता लाभलेल्या व्यक्ती कधी मानसिक आजारी होत्या यावर विश्वास बसणार नाही.
    First published:

    Tags: Aurangabad, Mental health

    पुढील बातम्या