अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. आई वडिलांना मुलांकडे द्यायला वेळ नसल्याने एका मुलीने थेट पालकांना धक्का दिला आहे. दरम्यान त्या मुलीचा वाढदिवस असल्याने तीला पालकांनी वेळ देणे अपेक्षित होते परंतु तीला वेळ न दिल्याने तीने थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ती मुलगी अवघ्या 13 वर्षांची होती.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आई वडिलांना मुलांकडे द्यायला वेळ नसल्याने एका मुलीने थेट पालकांना धक्का दिला आहे. दरम्यान त्या मुलीचा वाढदिवस असल्याने तीला पालकांनी वेळ देणे अपेक्षित होते परंतु तीला वेळ न दिल्याने तीने थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला.
16 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार, लग्नाला नकार अन् बॉयफ्रेंडने तिचा विषयच संपवला!
ती मुलगी अवघ्या 13 वर्षांची होती. रोजचे सोडा, पण वाढदिवसाच्या दिवशीही शिक्षक आई-वडील वेळ देत नाहीत म्हणून 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दोन मैत्रिणींना सोबत घेऊन थेट फिरायला जाण्याचा प्लॅन आखला.
28 फेब्रुवारीला सायंकाळी ट्यूशनला म्हणून घराबाहेर पडलेल्या तिघीही गायब झाल्या इकडे मुली घरी न परतल्याने पालकांची धावपळ सुरु झाली. रात्रीची वेळ असल्याने सर्वांनी गांभीर्याने घेत शोधाशोध सुरु केली.
वडिलांनी प्रेमविवाहाला दिला नकार; रागात मुलीने जन्मदात्यासोबत केलेलं कृत्य वाचूनच उडेल थरकाप
दरम्यान, मनमाडहून मुली परतल्या, पण एका ठिकाणी लपून बसल्या असल्याची माहिती मिळाली होती. यावरून एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यांना शोधून काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर यातील एक मुलगी शिक्षकांची असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.