Home /News /maharashtra /

Video : प्रचंड संताप, बोंबाबोंब; बंडखोर आमदार मुंबईत परतत असल्याने शिवसैनिक भडकले

Video : प्रचंड संताप, बोंबाबोंब; बंडखोर आमदार मुंबईत परतत असल्याने शिवसैनिक भडकले

आक्रोश मोर्चात बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

    नितीन नंदुरकर/ जळगाव, 2 जुलै : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील मंत्री व आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये रोष पाहायला मिळत असून जळगावतही माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यातच या बंडखोरांमुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे जळगावात शिवसैनिक संतप्त झाले असून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला. याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहे. या मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी काळे कपडे घालून सहभागी झाले होते तर हजारोंच्या संख्येने या आक्रोश मोर्चादरम्यान माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे देखील शिवसैनिकांनी दहन करत शिवसैनिकांनी बोंबाबोंब केली. तसेच बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आक्रोश मोर्चात बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Jalgaon, Mumbai, Shivsena

    पुढील बातम्या