Home /News /maharashtra /

...तर आले असते, पण औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला, पंकजा मुंडेंचं विधान

...तर आले असते, पण औरंगाबादेत मोर्चा लोकल लोकांनी काढला, पंकजा मुंडेंचं विधान

मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

    औरंगाबाद, 24 मे : औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नावर भाजपने जल आक्रोश मोर्चा ( bjp jal akrosh morcha aurangabad,) काढला होता. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होता मोर्चा काढला होता. पण, हा मोर्चा लोकल लोकांनी काढला होता. मी त्या मोर्च्यात अपेक्षित असते तर नक्की आले असते, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी दिली. पंकजा मुंडे औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी आपण दौऱ्याला का नाही आलो, याबद्दल प्रतिक्रिया दिली. 'पाण्यासाठी मी काम केलंय. औरंगाबाद नाही, मी जलयुक्त शिवार माध्यमातून राज्यासाठी काम केलंय. मोर्चात मी नसले तरी मी जागृत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. लोकल लोकांनी मोर्चा काढला होता, मी त्या मोर्चात अपेक्षित असते तर नक्की आले असते, असं उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं. (देशात ऑलिम्पिक चळवळ मजबूत होण्यासाठी प्रयत्नशील : नीता अंबानी) जलयुक्त शिवारात त्यांनी त्रुटी दुरुस्त कराव्यात बंद करू नये, या सरकारने दुष्काळ पहिला नाही. त्यामुळं सध्या त्यांना कळत नाही. मोर्चे काढून आम्ही सत्ता बदल केले आहेत असेच मोर्चे पुन्हा निघाले तर सरकार नक्की बदलेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात, ओबीसी आरक्षणाविना निवडणूक होऊ नये, मध्य प्रदेशनंतर आता तसेच काम आपण केले तर आपल्यालाही आरक्षण मिळेल, राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही हा मोठा गुन्हा आहे. ओबीसी आरक्षणाबाबत धोका झाला आहे.  मध्य प्रदेशने कसे केले तशी सूचना मी  राज्याला केली आहे. मदत लागली तर नक्की आम्ही मदत करू ओबीसी आरक्षणासाठी माझी सरकारला विनंती आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. (सई लोकूरचं नवऱ्यासोबत रोमॅंटिक फोटोशूट; पैठणीचा घागरा अन् जॅकेटनं दिला हटके लुक) 'ओबीसी हा प्राण आहे, सगळे समाज प्राण आहे मात्र ओबीसी हा पाठीचा कणा आहे. राज्य सरकारची मानसिकता आरक्षण टिकवून ठेवण्याची नाही. ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यात सरकार कमी पडत आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 'संभाजीराजे यांच्याबाबत सस्पेन्सचा शेवट मलाही पाहायचं आहे, तो सकारात्मक असावा. त्यांनी शिवबंधन बाधावे की नाही, ज्या त्या पक्षाची ती भूमिका आहे. छत्रपती घरण्यासोबत आमचे जवळचे संबंध आहे. त्यांना सगळयांनी सहकार्य करावे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या