मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो पण..., इम्तियाज जलील यांचा राज ठाकरेंवर पलटवार

तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो पण..., इम्तियाज जलील यांचा राज ठाकरेंवर पलटवार

'या सभेत नियमांचे उल्लंघन झालंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे नाही केले तर मी कोर्टात जाणार'

  • Published by:  sachin Salve

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 01 मे : 'ते म्हणतात इशारा, तर आता पोलिसांनी अर्थ सांगावा, नाही सांगितलं तर जीभ आम्हाला ही आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकत. पण यांचा दंगल करायचा हा डाव आहे.' अशी टीका एमआयएमचे खासदार इम्जिताज जलील (imtiaz jaleel) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांच्यावर केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात सभा घेऊन 4 तारखेपासून भोंगे ऐकून घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्यांच्या या सभेवर इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले.

'ते म्हणतात इशारा, तर आता पोलिसांनी अर्थ सांगावा, नाही सांगितलं तर जीभ आम्हाला ही आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. दंगल करायचा हा डाव आहे. मात्र याला अंत नाही. भोंगे काढायला आमचा विरोध नाही आम्ही कधीही विरोध केला नाही. या सभेत नियमांचे उल्लंघन झालंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे नाही केले तर मी कोर्टात जाणार, असा इशाराही जलील यांनी दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा हा मुस्लिम जनतेला नाही, राज्याला आहे. आम्हाला पाहायचं आहे आणि आता हे कसे निर्णय घेतात खास करून राष्ट्रवादीचे लोक काय निर्णय घेतात हे पाहण्यास ठरणार आहे, असंही जलील म्हणाले.

(कॅन्सरशी लढा देणारी छवी मित्तल सर्जरीनंतर पोहोचली याठिकाणी,स्वत:लाच दिली शाबासकी)

'आता यांनी एक दिवस वाढवून दिला आहे. डेडलाईन 1 दिवसाने वाढली आहे,याच कारण म्हणजे ते म्हणतात कार्यकर्त्यांनो तुम्ही करा आणि मी अयोध्येला जातो ते मरणार हे फिरणार, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार आहे. हे युवकांना सांगताय मशिदीसमोर जा आणि काही झालं तर काय करायचं, जे येतील त्यांच्यावर केसेस होता. गुन्हे दाखल झाल्याने तरुणांचे आयुष्य पोलीस स्टेशनच्या चकार मारण्यात जातात, असंही इम्तियाज जलील म्हणाले.

'भारतीय जनता पार्टी तुम्हाला रिमोट कंट्रोलद्वारे चालवत आहे. तरुणांना चुकीच्या मार्गाला पाठवायचे काम सुरू आहे,धार्मिक तेढ वाढवण सुरू आहे. राजकीय द्वेषाची जखम भरली जात नाही. भाजप सरकारने त्यांच्या काळात काहीच केलं नाही. एक वर्ष आधी आपण काय करत होतो आणि आता काय करतोय' असा टोलाही जलील यांनी राज ठाकरेंना लगावला.

'खिलजीची आठवण आता कशाला, जे चूक झालं ते झालं आज का काढायचं हे आयुष्य आपल्याला बोनस मिळाले आहे, कोरोनानंतर आपण जगलोय. कोर्टाचे आदेश आम्ही पाळू कारण तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आम्ही नकार कधी दिला नाही,

मी राज्य सरकार आणि पोलीस यांना विनंती करतोय. आम्हा मुस्लिम बांधवांचा यात काही नाही. हे सगळं चूक आहे आपण विचार केला पाहिजे. तुम्ही डुप्लिकेट माणूस आहात आम्ही नाही. सभा करून निर्णय होत असेल तर या पेक्षा दुप्पट सभा आम्ही घेऊ, भोंगे बाबत माझा विरोध नाही, मुस्लिम समाज विरोध करणार नाही मात्र नियमाने जायला हवे. नियम पाळायचे असेल तर पोलीस स्टेशन कोर्ट बंद करून टाका. इतकं आम्ही बोललो असतो तर आमच्यावर केसेस केल्या असत्या. मी ही बोलू शकतो, जीभ आम्हालाही आहे, आता सरकारने निर्णय घ्यावा, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

(छोटे कपडे घालते, म्हणून भररस्त्यात तरुणीला मारहाण; धक्कादायक घटना)

सुप्रीम कोर्टाने भोंगे काढायला सांगितलं नाही, कोर्ट म्हणाले डेसीबीलचा नियम पाळा, आता सरकारने निर्णय घ्यावा. हा देश आमचा आहे आणि आम्ही सगळे सोबत राहू. माझ्या अजानसाठी आम्ही दुसऱ्यांना त्रास देणार नाही अडचण असेल तर बसून सोडवू, असं आवाहनही जलील यांनी केलं.

राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आता एकदा होऊन जाऊ द्या याचा अर्थ काय? बाबरी मुस्लिम समाजाने स्वीकारलं ना मग पुन्हा मुद्दा कशाला. बाबरी पुन्हा का आली तर पुन्हा मुस्लिम विषय काढून राजकारण याना करायचं आहे. यातून ते मोठं व्हायचं स्वप्न पाहत आहे, असा टोलाही जलील यांनी लगावला.

First published: