Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंनी जिंकली औरंगाबादची सभा आणि राज्यसभेची लढाई? MIM च्या खासदाराने दिली ऑफर

उद्धव ठाकरेंनी जिंकली औरंगाबादची सभा आणि राज्यसभेची लढाई? MIM च्या खासदाराने दिली ऑफर

'राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू, आम्ही वाट पाहू'

'राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू, आम्ही वाट पाहू'

'राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू, आम्ही वाट पाहू'

    औरंगाबाद, 08 जून :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा  (cm uddhav thackery Speech at aurangabad) घेऊन प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांना फटकारून काढलं. त्यांच्या भूमिकेचं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी स्वागत केलं. 'राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले, संपर्क केला तर विचार करू पण, मतदान करतांना आमच्या अटी आहेत' अशी ऑफरच जलील यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अपक्ष आमदारांची मत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि भाजप तारेवर कसरत करत आहे. अशातच औरंगाबादेत सभा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खणखणीत भाषण केलं. त्यांनी इस्लाम धर्माबाबत भूमिकेचं इम्तियाज जलील यांनी स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांचं स्वागत आहे.  इस्लाम धर्माचा द्वेष करत नाही याचं स्वागत आहे. इस्लाम मुद्द्यावर भारताने माफी मागण्याची गरज नाही. पण बाबरी पडून ३० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाले, मग पुन्हा पुन्हा बाबरी का? त्यापेक्षा विकासावर बोलले असते तर बरं झालं असतं, असं इम्तियाज जलील म्हणाले. (Daily Horoscope : चांगलं सरप्राइझ मिळणार पण एका गोष्टीची काळजी मात्र नक्की घ्या) राज्यसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत महविकास आघाडी, भाजप वा अन्य कुणीही संपर्क केला नाही. तुम्ही आले संपर्क केला तर विचार करू, आम्ही वाट पाहू. मतदान करतांना आमच्या अटी आहेत. एमआयएम उमेदवारांच्या मतदारसंघात विकास होणार असेल, तिथल्या लोकांचं भल होणार असेल तर आम्ही तडजोड करण्यासाठी तयार आहोत, अशी ऑफरच जलील यांनी महाविकास आघाडीला दिली.  तसंच, भाजपला mim चं उत्तर माहीत आहे, त्यामुळे ते आमच्याकडे आले नसावेत, असा टोलाही जलील यांनी लगावला. तसंच, या सभेतून येणाऱ्या २ - ३ वर्षात औरंगाबादला पाणी मिळणार नाही, हे स्पष्ट झालं. पालकमंत्री कोणता मोठा उद्योग आणणार, हे देखील स्पष्ट केलं असत तर बरं झालं असतं. पाणी योजनेसाठी किती पैसे दिले हे महत्त्वाचे नाही, पाणी कधी मिळणार हे महत्त्वाचे आहे, मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होती, असंही जलील म्हणाले. (IIFA नंतरचा सईचा पार्टी लुक चर्चेत; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव, म्हणाले...) औरंगाबादला मेट्रोची गरज नाही, उड्डाणपुलाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या रोख भाजप आणि राज ठाकरेंवर होता. औरंगाबादचा विकास झाल्यानंतर नामांतराचा विषय पाहू असं मुख्यमंत्री म्हणाले याचं स्वागत आहे. औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महारजांचं नाव देण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असंही जलील म्हणाले. सुभाष देसाई भाषणात शहराच्या पाणी पुरवठ्याबद्दल खोटं बोलले. कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबादला पाणी मिळण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतील.  टीका करताना मुद्दे लागतात. इम्तियाज जलील काय चुकीचे काम करतात, हे शोधून देखील सापडल नसेल. त्यामुळे बहुतेक आमच्यावर टीका केली नसेल, असंही जलील म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या