छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्रात शिंदे गटाला पाठिंबा देणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हटलं संजय शिरसाट यांनी?
राष्ट्रवादी नागालँडमध्ये भाजपसोबत जाऊ शकते मग महाराष्ट्रात ते आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत आहे. शरद पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा लागली आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. घोषणा दिल्यानं कोणी मुख्यमंत्री होत नाही. आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकत नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Budget : आज फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार; 'या' क्षेत्राला मिळणार मोठा दिलासा!
नागालॅंडमध्ये भाजपला पाठिंबा
नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत झालं असताना देखील नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे या पाठिंब्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, NCP, Sharad Pawar, Shiv sena