मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आधी पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन् नंतर... जालन्यात हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं

आधी पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन् नंतर... जालन्यात हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं

डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या

डोक्यात दगड घालून पत्नीची हत्या

जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalna, India

जालना, 2 फेब्रुवारी : जालन्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. हत्येनंतर पतीने देखील विषारी औषध पेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पळसखेड मूर्तड येथील ही घटना आहे. संगिता अर्जुन सोनवणे असं मृत महिलेचं नाव आहे. तर अर्जुन सोनवणे असं आरोपी पतीचं नाव आहे. सध्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वाद विकोपाला गेला 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अर्जुन सोनवणे हा आपल्या कुटुंबासह वरुड शिवारात राहत होता. अर्जुन याला दारूचे व्यसन जडल्याने घरात नेहमी वाद होत होते. बुधवारी संगीताबाई या मुलासह अंगणात गहू वाळवत असतांना दारू पिऊन आलेल्या अर्जुनने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यानंतर अर्जुन याने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घातला.  घटनेनंतर अर्जुन घटनास्थळाहून पसार झाला.

हेही वाचा : अंघोळीच्या साबणात लपवले 33 कोटी, मुंबई विमानतळावरील प्रकार पाहून पोलीसही चक्रावले

गुन्हा दाखल  

जखमी अवस्थेत संगीताबाई यांना सिल्लोड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर आज सकाळी अर्जुन सोनवणे याने विषारी औषध प्राशन केले. त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान मयत महिलेचा भाऊ संजय गावंडे यांच्या तक्रारीहून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published: