सुखात थाटायचा होता संसार, पण काळाने केला घात; लग्नानंतर दीड महिन्यातच पती-पत्नीचा मृत्यू
सुखात थाटायचा होता संसार, पण काळाने केला घात; लग्नानंतर दीड महिन्यातच पती-पत्नीचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो
सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रूजरने एका मोटरसायकला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी गाडीखाली चिरडले गेले. (Husband Wife Died in Road Accident)
अविनाश कानडजे, प्रतिनिधी. औरंगाबाद 04 ऑगस्ट : मृत्यू कधी, कसा आणि कुठे येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. दुर्घटना या इतक्या अचानक घडतात की काही कल्पना येण्याच्या आतच होत्याचं नव्हतं होऊन जातं. असंच काहीसं औरंगाबादमधील एका दाम्प्त्यासोबत घडलं, ज्यांनी नुकतंच सोबत जगण्या-मरण्याचं वचन एकमेकांना दिलं होतं. मात्र, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सोबत जगण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र, अवघ्या एका दिवसाच्या अंतराने दोघांनीही जगाचा निरोप घेतला.
अमरावतीच्या मेळघाटात भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी
सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा-पारोळा फाट्यावर भरधाव क्रूजरने एका मोटरसायकला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी गाडीखाली चिरडले गेले. घटनेत पतीचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र बुधवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीनेही अखेरचा श्वास घेतला. (Husband Wife Died in Road Accident)हैवान नवऱ्याने बायको-मुलांना अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं; 17 वर्षांनी दरवाजा उघडताच...
या दोघांच्या लग्नाला अवघा दीड महिना झाला होता. दीड महिन्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. सुखात संसार थाटण्याचं या जोडप्याचं स्वप्न क्षणात संपलं. अवघ्या एका दिवसाच्या अंतराने दोघांनीही जगाचा निरोप घेतला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघंही सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील रहिवासी होते. दुचाकीने प्रवास करत असतानाच त्यांचा अपघात झाला. ज्यात दोघांनाही जीव गमवावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.