मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भोंगे उतरलेच पाहिजे, नाहीतर 4 तारखेपासून अजिबात ऐकणार नाही', राज ठाकरेंचा थेट इशारा

'भोंगे उतरलेच पाहिजे, नाहीतर 4 तारखेपासून अजिबात ऐकणार नाही', राज ठाकरेंचा थेट इशारा

'आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही.

औरंगाबाद, 01 मे : 'आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं, असा इशाराच राज ठाकरेंनी (raj thackery aurangabad sabha 2022 ) दिला.

औरंगाबादमध्ये विराट अशा गर्दीत राज ठाकरेंची ऐतिहासिक उत्तर सभा पार पार पडली. या सभेला अभुतपूर्व अशी गर्दी झाली होती. यावेळी बोलत असताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.

'आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं. सगळ्या हिंदू बांधवांना सांगत आहे. आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा. हा विषय कायम निकाली लागला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

(छोटे कपडे घालते, म्हणून भररस्त्यात तरुणीला मारहाण; धक्कादायक घटना)

'माझी पोलिसांना विनंती आहे, जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे,  त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे, जर ती ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, अजिबात शांत बसू नका, संभाजीनगर पोलिसांना हात जोडून विनंती आहे, जर हे असे वागत असतील महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ते दाखवूनच देऊ' असा इशाराच राज ठाकरेंनी दिली.

शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंची टीका

'माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो. त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं.

(कॅन्सरशी लढा देणारी छवी मित्तल सर्जरीनंतर पोहोचली याठिकाणी,स्वत:लाच दिली शाबासकी)

'जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला. मराठा बांधवाची माथी भडकवायचा. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढात. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवार साहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत' अशी टीकाच राज ठाकरे यांनी पवारांवर केली.

First published: