घाटी हॉस्पिटल मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना आजार घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे.
औरंगाबाद, 27 जुलै: मराठवाड्यातील ( Marathwada ) रुग्णांसाठी घाटी हॉस्पिटल आशेचा किरण म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी सामाजिक संस्थेने पिण्याच्या पाण्याची टाकी बसवली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचा टाकी ( TankArea ) परिसर स्वच्छ ठेवणे याचा घाटी हॉस्पिटलला ( Ghati Hospital In Aurangabad ) विसर पडला आहे. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आजार घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे.
घाटी हॉस्पिटल मध्ये मराठवाड्यासह अहमदनगर, नाशिक, जळगाव यासारख्या जिल्ह्यांमधून दररोज साधारणतः दिड हजार रुग्ण उपचार घेण्यसाठी येत असतात. उपचारासाठी येणारे रुग्ण व नातेवाईक फक्त अंगावरचे कपडे घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्या खाण्याची व पाणी पिण्याची सोय व्हावी यासाठी सामाजिक संस्थांतर्फे अन्नदान व पाणी वाटप केले जाते. यासाठी लायन्स क्लब व माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांच्या तर्फे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्यात आली आहे.
या टाकीची स्वच्छता करण्यासाठी घाटी हॉस्पिटल दुर्लक्ष करत आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असल्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाटी हॉस्पिटल मध्ये राहतात. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी जवळ जावे लागते. मात्र, आजार बरा होण्यासाठी आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना पाण्याची टाकी वेळेवर स्वच्छ न केली जातं असल्यामुळे व पाण्याच्या टाकीच्या परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरल्यामुळे हे पाणी पिल्याने आजार घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे, असे येथील रुग्ण व नातेवाईक सांगतात.
दुर्गंधी व अस्वच्छता मुळे आजार घरी घेऊन जाण्याची वेळ
मराठवाड्यासाठी घाटी हॉस्पिटल हे महत्त्वाचं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. घाटी हॉस्पिटल मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणी दुर्गंधी व अस्वच्छता आहे. यामुळे आजार बरा करण्यासाठी आलेल्या रुग्णांवर तो आजार घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने ही दुर्गंधी स्वच्छ करावी, अशी मागणी नागरिक अक्षय दांडगे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, सामाजिक संस्था तर्फे उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यात येणार असून यासंबंधी असलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा करून तात्काळ ते स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. लवकरच ते स्वच्छ करून नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणार आहे ,असं आश्वासन या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.काशिनाथ चौधरी यांनी दिले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.