औरंगाबाद, 4 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या घटनेने औरंगाबाद शहर हादरले होते. दरम्यान ही घटना ताजी असताना दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट लग्न करून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. बनावट लग्न करून लुटायचे नवरदेवांना लुटल्याचा प्रकार समोर आला होता.
लग्नाचे सोंग मांडले -
बनावट लग्न लावून फसवणुकीचे गुन्हे हे पैठण तालुक्यात वाढले आहेत. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल एका लग्नाच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता मुलाच्या घरच्यांना आरोपीने आमच्याकडे मुलगी आहे, तिला आई-वडील नाही. तिला लग्न लावून देण्यासाठी दीड लाख रुपये द्या, आम्ही तुमच्या मुलाचे लग्न करून देतो, असे सांगितले. यानंतर 18 ते 20 हजार रुपयांची खरेदी करून लग्नाचे सोंग मांडले होते,
मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पडला आणि एका महिलेसह 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर तसेच परराज्यात देखील यापूर्वी बनावट लग्न केले असल्याचा संशय असून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.
हेही वाचा - Shocking! नवरदेवाला वरमाळा घालताच भयानक घडलं; लखनऊमध्ये नवरीचा स्टेजवरच मृत्यू
औरंगाबादमध्ये तरुणाचा खून करून मृतदेह फेकला पाईपमध्ये -
मदतीसाठी एकाने उसने पैसे दिले होते हे पैसे चारचौघात का मागितले म्हणून थेट खून करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका मोठा असल्याने तालुक्यात पैशाची मोठी उलाढाल होत असते. यामुळे पैशाची देवाण घेवाणही याठिकाणी होत असते. दरम्यान यातून उसणे दिलेले पैसे चार चौघात मागितल्याच्या राग आल्याने सागर संतोष जैस्वाल या 21 वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना कन्नड तालुक्यात उघडकीस आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad News, Crime news, Financial fraud, Marriage