मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : भर सभेत हाणामारी, 'चौरंग करून घरी पाठवेन', राज ठाकरेंनी सुनावले

BREAKING : भर सभेत हाणामारी, 'चौरंग करून घरी पाठवेन', राज ठाकरेंनी सुनावले

: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत गोंधळ झाला. यावेळी हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले.

: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत गोंधळ झाला. यावेळी हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले.

: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत गोंधळ झाला. यावेळी हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले.

  • Published by:  sachin Salve

औरंगाबाद, 01 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेत गोंधळ झाला. यावेळी हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले. राज ठाकरेंनी यांनी भाषण थांबवून गोंधळ घालणाऱ्यांना ऐकवले. ही मनसेची सभा आहे, इथं जर गडबळ गोंधळ घातला तर चौरंग करून घरी पाठवेन, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. (raj thackery aurangabad sabha 2022 )

औरंगाबादमध्ये विराट अशा गर्दीत राज ठाकरेंची ऐतिहासिक उत्तर सभा पार पडली. या सभेला अभुतपूर्व अशी गर्दी झाली होती. यावेळी बोलत असताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.

सभेच्या ठिकाणच्या मागील बाजूस गोंधळ झाला होता.  सभेला गर्दी झाल्याने झाल्याने गोंधळ झाले होते. यावेळी  पाण्याच्या बॉटल, माती भिरकवत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. राज ठाकरेंनी यांनी भाषण थांबवून गोंधळ घालणाऱ्यांना ऐकवले. ही मनसेची सभा आहे, इथं जर गडबळ गोंधळ घातला तर चौरंग करून घरी पाठवेन, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी आपलं भाषण पूर्ण केलं.

(कॅन्सरशी लढा देणारी छवी मित्तल सर्जरीनंतर पोहोचली याठिकाणी,स्वत:लाच दिली शाबासकी)

'खरंतर सभा होणार, नाही होणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी, न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार, नाही मिळणार, खरंतर का ही गोष्ट केली मला अजूनही समजलेली नाही. मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात सभा घेतली तरी तुम्ही टीव्हीवरुन पाहिलंच असतं तर. मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी सभा घेतली. त्या सभेनंतर बरेचजण बडबडायला लागले. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा एक ठाण्यात घेतली. खरंतर मी दोनच सभा घेतल्या. पण या दोन सभेवरती हे किती बोलत आहेत, असा टोला राज ठाकरेंनी शिवसेनेला लगावला.

'ठाण्यात ज्यावेळेला सभा झाली, दिलीप धोंधरेंनी फोन केला, त्यांनी संभाजीनगरला एक सभा घेऊया सांगितलं. संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मी हो सांगितलं. आता हा विषय फक्त संभाजीनगरपुरता मर्यादीत नाही. आता यापुढच्या प्रत्येक सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. तसाच विदर्भातही जाणार आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. पण या सभां आडकाठी आणून काहीच होणार नाही. कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. कोंबडा झाकायचा ठेवला तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. सूर्य उगवतोच, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

'आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये, जी काही उरलीसुरली आहे ती संभाजीनगरमध्ये काढू. मला कल्पना आहे की, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगर शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. दहा-दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. पण आजचे जे प्रमुख विषय आहेत त्या विषयांना घेऊन मी बोलणार आहे' असंही राज ठाकरे म्हणाले.

(छोटे कपडे घालते, म्हणून भररस्त्यात तरुणीला मारहाण; धक्कादायक घटना)

महाराष्ट्राची आज काय परिस्थिती चाललीय? आमच्या महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली जातेय. रोज आमच्या महाराष्ट्रातील नेते वाट्टेल ते बरळत आहेत. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत ते राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील? टीव्हीवर आज जे दिसतंय ते राजकारण आहे? हा आपला महाराष्ट्र आहे? ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, असंही राज ठाकरे म्हणाले.

यांच्या सगळ्यांचं बोलणं आम्ही हसण्यावर घेतोय. यासाठी आम्हाला महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आहे? जनता आम्ही काही बोधच घेणार नाही आहोत. सर्वात जास्त समाजसेवक, विचारवंत या महाराष्ट्रात जन्माला आले. पण आपण आज महाराष्ट्राची काय अवस्था करुन ठेवलीय, आई-बहिणीवरुन शिव्या घालत आहेत. कोणी मुद्द्याचं बोलायलाच तयार नाही. सगळेजण हुद्द्यावर बोलत आहेत. आम्ही तरुणांना काय शिकवतोय, हुल्लडबाजी? याचं कारण आमचं लक्षच नाही. राज ठाकरेंचं भाषण आहे, घोषणा द्या, निघायचं आणि.. आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमच्या हाताला काही लागत नाही, सगळ्या राजकारण्यांना हेच हवं आहे. माझी दोन भाषणं काय झाली त्यावर सगळे फरफडायला लागले, असंही राज ठाकरे म्हणाले.

First published: