मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने केली आत्महत्या, औरंगाबाद हादरलं

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने केली आत्महत्या, औरंगाबाद हादरलं

अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

    अविनाश कानडजे,प्रतिनिधी औरंगाबाद, 22 सप्टेंबर : औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माधवराव आग्रहारकर (वय 55) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. सकाळी 8.30 वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा, प्रेयसीनेही केली मदत) आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून व्यापाऱ्याला व्यावहारिक त्रास असल्याची परिवाराने माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या दरम्यान, नांदेडमध्ये इंजिनिअरिंगच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. गीता कदम असे मयत तरुणीचे नाव असून ती उस्मानाबादची रहिवाशी होती. नांदेडच्या श्री गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई यांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होती. (पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, गोंदियातील विवाहित तरुणासोबत भयानक कृत्य) वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी नांदेडच्या ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. बुधवारपासून गायब असलेल्या या तरुणीने हॉस्टेलच्या एका खोलीत जाऊन ही आत्महत्या केल्याची माहिती प्राचार्यानी दिली. दरम्यान, मयत तरुणीने महिला आयोगाच्या नावाने सुसाईड नोट लिहिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: औरंगाबाद

    पुढील बातम्या