मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Photos: दुर्मीळ माहिती आणि छायाचित्रांनी जागा झाला मुक्ती संग्रामाचा इतिहास

Photos: दुर्मीळ माहिती आणि छायाचित्रांनी जागा झाला मुक्ती संग्रामाचा इतिहास

जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने शहरातील सिद्धार्थ उद्यानातील हॉलमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने शहरातील सिद्धार्थ उद्यानातील हॉलमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने शहरातील सिद्धार्थ उद्यानातील हॉलमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरानी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झाला. आज त्याला 74 वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आता सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास प्रत्येकाला माहित व्हावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने शहरातील सिद्धार्थ उद्यानातील हॉलमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या छायाचित्र प्रदर्शनामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील छायाचित्रे दाखवण्यात आले आहेत. चला मग याच छायाचित्र प्रदर्शनामधील काही निवडक छायाचित्र आणि त्या संदर्भातील माहिती जाणून घेऊया. 17 ऑक्टोबर 1911 रोजी सातवा निजाम गादीवर आला. त्याने सत्तेवर येताच आपल्या पंतप्रधानाकडील अधिकार स्वतःकडे घेतले. त्या आधी पंतप्रधान स्वतंत्र कार्य करणारे पद होते. सगळ्या निजामांची राजवट ही शेवटी राजसत्ता होती. लोककल्याण हेतू कधीच नव्हता. सातव्या निजामाच्या कालखंडात या राजसत्तेविरोधात प्रतिक्रिया उमटत गेल्या आणि पुढे त्या आणखी तीव्र झाल्या. हैदराबादच्या विविध भागात हा रोष उमटत होता. हे स्वातंत्र्यासाठीचे बंड असले तरी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी त्याचा थेट संबंध येत नव्हता. कारण इथे परकीय इंग्रजी छायेपेक्षा सरंजामी जुलमी राजवटीची छाया अधिक गडद होती. भारतात लोकमान्य टिळक युग सरत चालले होते आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाचा काळ सुरू झाला होता. सन 1918 मध्ये वामन नाईक यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय काँग्रेसची शाखा हैदराबादेत आली. पुढे सन 1921 मध्ये हैदराबादेत राजकीय सुधारणा संघ नावाची संस्था स्थापन झाली. या माध्यमातून परिषदांचे आयोजन केले गेले. यामधून संस्थानातील सुधारणांसंबंधी जनतेचे मत सरकारला कळवावे असे ठरले. समितीचे अध्यक्ष होते बॅ. मौलवी असगर महंमद तर उपाध्यक्ष केशवराव कोरटकर आणि वामन नाईक. परिषदेचे कामही सुरू झाले होते. मात्र सरकारने परवानगी नाकारली. यातून दिसून आली ती निजामाची सरंजामी वृत्ती. सन 1937 आणि 1938 ही दोन वर्षे मुक्तीसंग्रामातील वलयांकित वर्षे ठरली. या दोन वर्षात अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी चळवळीला दिशा आणि गती दिली. 1937 मध्ये मराठवाड्यात महाराष्ट्र परिषदेची स्थापना आणि परतूरला पहिले अधिवेशन झाले. गोविंदराव नानल हे परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपेंच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात स्वामीजींनी प्रथमच मोठ्या जनसमुदायासमोर स्वातंत्र्यप्राप्ती, शोषण, दारिद्रयातून मुक्तीसारखे ज्वलंत विषय मांडले. याच काळात स्वामीजी, परांजपे आणि हिप्परगा शाळेतील अनेक शिक्षक मोमिनाबादला (सध्याचे नाव अंबाजोगाई) आले. चळवळीला नवे बळ मिळाले. सन 1938 या वर्षी घणाघाती प्रहार करणारे मराठी साप्ताहिक हैदराबादमधून प्रकाशित होण्यास प्रारंभ झाला. 'साप्ताहिक मराठवाडा' आ. कृ. वाघमारे यांच्या टोकदार लेखणीने पुढे स्वातंत्र्यविचार आणखी प्रज्वलित केले. 10 फेब्रुवारी रोजी पहिला अंक निघाला. सडेतोड स्फोटक लिखाणातून निजामावर प्रहार करणारा 'मराठवाडा' सरकारच्या डोळ्यांत खुपू लागला आणि बंदी आणली गेली. आनंदराव पूर्ण तयारीनिशी होते त्यांनी दुसऱ्या नावाने अंक प्रकाशित करणे सुरु केले. त्यावर बंदी आली की आणखी एक नाव... तब्बल 11 नावांनी हा क्रम सुरु राहिला. सत्याग्रहांचा प्रारंभ 1938 मध्ये सत्याग्रहांना सुरूवात झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे अग्रणी म्हणून तेव्हापासून पुढे आले ते थेट पोलिस अॅक्शनपर्यंत. या वर्षी पहिल्या सत्याग्रहाचा दंड हाती धरल्याने स्वामीजी जनमानसात रुजले आणि स्टेट काँग्रेसची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या कडे आली. लक्षणीय बाब म्हणजे हैदराबादेत हा सत्याग्रह होत असताना आंध्र- तेलंगणातील नेते सत्याग्रहाच्या विरोधात होती. त्यांना वाटाघाटीतूनच काही साध्य होईल असे वाटत होते. मात्र सर्वसामान्यांना या सत्याग्रहातून मार्ग निघेल असे वाटू लागल्याने अनेकांनी पाठींबा दर्शविला होता. सहभाग देखील घेतला होता. 24 ऑक्टोबर 1938 रोजी गोविंदराव नानल यांनी हैदराबादेत चार सहकार्यांसह पहिल्या अहिंसक सत्याग्रहाला प्रारंभ केला. या चार सहकार्यांमध्ये एच. रामकिशन धूत, रविनारायण रेड्डी, श्रीनिवास बोरीकर, जनार्दनराव देसाई यांचा समावेश होता. नानलांपाठोपाठ स्वामीजींना पहिल्या तुकडीचे सर्वाधिकारी नियुक्त केले गेले आणि त्यांच्या तुकडीत व्यंकटेश बापूजी अर्थात कॅप्टन जोशी, राघवेंद्र दिवाण, राज रेड्डी आणि अप्पाराव हे सहभागी होते. ऑक्टोबर 1947 पासून मुक्तिसंग्रामाचे स्वरूप पूर्णच बदलले, सशस्त्र क्रांतीचे हत्यार हाती आले होते आणि बघता बघता मराठवाड्यात सर्वत्रच सशस्त्र आंदोलने सुरू झाले. डिसेंबर - जानेवारीमध्ये अनेक सत्याग्रही औरंगाबाद व उस्मानाबाद जेलच्या भिंती फोडून पळाले आणि भूमिगत राहून त्यांनी कार्य सुरू केले. खाली बसलेले अण्णाराव पाटील, रामचंद्र मंत्री, विठ्ठलराव जामगावकार,खुर्चीवर बसलेले बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, उभे गुरुजी, रामभाऊ जाधव, चंद्रशेखर बाजपाई, नरहर मालखरे, शेषराव वाघमारे, व्यंकट बापूजी जोशी (कॅप्टन), भगवान तोडकरी, देव, राजेंद्र देशमुख वरील चित्रामध्ये दिसत आहेत. ऑपरेशन पोलो संस्थानातील स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त झाला. निजामाकडून भारतीय सरकारशी झालेल्या कराराचा झालेला भंग, रझाकारांनी केलेला रक्तपात, लूटमार, संस्थानातील स्वातंत्र्यलढ्याचा दबाव यामुळे भारत सरकारने निजामाला पुन्हा इशारेवजा सूचित केले. मात्र निजामाने संस्थानात सर्व आलबेल असल्याचे कळविले, प्रत्यक्षात वस्तुस्थिती विपरीत होती संस्थानातील नागरिकांवर होणारे अत्याचार आणि रझाकारांचा उत्पात संपत नव्हता.  पोलीस कारवाई नंतर लष्कर ताफ्याचे आनंदाने स्वागत करताना नागरिक दिसत आहेत.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या