औरंगाबाद, 05 डिसेंबर : नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील ओझर गावात 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली. गंगापूर फाट्यावर ही पीडित पारधी समाजाची महिला राहते. तिच्या नातवाने आरोपीच्या मुलीला 1 तारखेला पळवून नेलं होतं. म्हणून त्याला शोधण्यासाठी ही व्यक्ती गंगापूर फाट्यावर आली होती. त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. पीडित महिलेच्या घरी पोहोचले आणि तिच्याकडे विचापूस केली.
(माता न तू वैरिणी! पोटच्या 15 वर्षीय मुलाची हत्या; मग घरातच खड्डा खोदून केलं थरकाप उडवणारं काम)
त्यानंतर या तिघांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली. हे तिघे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी या पीडित महिलेला नग्न करून मारहाण केली. पीडित वृद्ध महिलेला काहीच माहित नसल्यामुळे तिने गयावया केली, पण या तिघांनी तिच्यावर कोणतीही दया दाखवली नाही. बेदम मारहाणीमध्ये ही महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर वस्तीवरील लोकांनी आरडाओरडा करत घराकडे धाव घेतली. त्यानंतर या तिघांनी तिथून पळ काढला.
या घटनेला दोन दिवस उलटले तरी कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. पीडितेवर घरीच उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पीडितेनं गंगापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी विवेक उर्फ चवल्या पिंपळे यांच्यासह 2 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
(भयानक! दारूच्या नशेत आईची हत्या, भाऊ आणि वडिलांवरही हल्ला)
धक्कादायक म्हणजे, या आरोपींनी पीडित महिलेला विवस्त्र करून मारहाण करत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news