मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवाब मलिकांनंतर उस्मानाबादमध्ये ईडीची मोठी कारवाई; तब्बल 45 कोटींची मालमत्ता जप्त 

नवाब मलिकांनंतर उस्मानाबादमध्ये ईडीची मोठी कारवाई; तब्बल 45 कोटींची मालमत्ता जप्त 

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

मनी लॉंड्रिग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
उस्मानाबाद, 8 जुलै : उस्मानाबाद (Osmanabad News) जिल्ह्यातील एका कंपनीवर ED ने कारवाई केली आहे. उमरगा (EDs major operation in Osmanabad ) MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे. तर गेल्या 5-6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता-पूत्र संचालक असलेल्या फॅक्टरीची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सद्या बंद आहे. मनी लॉंड्रिग कायदा 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनी कायद्यांतर्गत जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 5 मार्च 2009 रोजी नोंदणी केली आहे. त्यानुसार 15 कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे, तर पेड कॅपिटल 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे. तर 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सअंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा उद्देश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच ईडीची मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिक यांची उस्मानाबाद तालुक्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन व त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. मलिक सध्या तुरुंगात आहेत.
First published:

Tags: Crime news, Osmanabad

पुढील बातम्या