मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सामना आणि संपादकांचे केंद्रबिंदू बदललेत' : देवेंद्र फडणवीस

'सामना आणि संपादकांचे केंद्रबिंदू बदललेत' : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis takes dig on Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis takes dig on Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis takes dig on Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • Published by:  Sunil Desale

औरंगाबाद, 4 नोव्हेंबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी शरद पवारांची (Sharad Pawwar) भेट घेतल्यानंतर भाजपविरोधात लढण्यासाठी यूपीए समांतर आघाडीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर आज सामनाच्या संपादकीयमधून म्हटलं, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखे आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (Devendra Fadnavis takes dig on Shiv Sena and Sanjay Raut)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पहिल्यांदाच सांगितलं की, सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झालेले आहेत. म्हणून मला असं वाटत आहे की, तिच प्रचिती आता यातून आपल्याला मिळत आहे.

वाचा : 'केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण नको', अशोक चव्हाणांचा ममतादीदींना सल्ला

मेस्मा लावण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढा

एसटी संपा संदर्भात सरकारची भूमिक लोकशाही विरोधी आहे. मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न सरकारच्या वतीने होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं. सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं मात्र, ते त्यासाठीही तयार नाहीयेत. काल तर मला माहिती मिळाली की, एक उपोषणकर्ता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मला असं वाटतं की, सरकारच्या संवेदनना हरवल्या आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मेस्मा लावण्यापूर्वी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचा : देशातली तिसरी आघाडी नेमकी आता कुणाच्या नेतृत्वात, शरद पवार-ममता बॅनर्जी यांचं एकत्र उत्तर

सामनाच्या संपादकीयमध्ये नेमकं काय म्हटलंय?

भाजपची रणनीती काँग्रेसला रोखण्याची असेलच, पण हीच रणनीती मोदी अथवा भाजपविरोधाच्या मशाली पेटवणाऱ्यांनी ठेवली तर कसे व्हायचे? देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आहेच कुठे? हा सवाल मुंबईत येऊन ममता बॅनर्जी यांना विचारला. तो प्रश्नच सध्याच्या स्थितीत लाखमोलाचा आहे. यूपीए अस्तित्वात नाही तसा एनडीएही नाही. मोदी यांच्या पक्षाला आज एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे. यूपईए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपचे हात बळकट करण्यासारखेच आहे.

यूपीएचे नेतृत्व कोणी करावे? हा प्रश्न आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए कोणाकोणाला मान्य नाही त्यांनी जाहीरपणे हात वर करावेत, स्पष्ट बोलावे. पडद्यामागून गुटरगूं करू नये. त्यातून गोंधळ आणि संशय वाढतो. त्याचप्रमाणे यूपीएचे तुम्ही काय करणार? हे एकदा तरी सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी समोर येऊन सांगाला हवे असंही साना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Mamata banerjee, Sanjay raut, Shiv sena, Sonia gandhi, शरद पवार