औरंगाबाद, 8 जानेवारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेचा चांगलाच समाचरा घेतला आहे. सत्ता आल्यानंतर नेत्यांनी जमिनीवर राहिला पाहिजे. मात्र काही जण टोकाची भूमिका घेतात, हवेत उडतात असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमकं हवेत कोण आहे हे तपासलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हटलं फडणवीसांनी
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार टोला लगावला आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे, आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. नेमकं हवेत कोण आहे हे तपासलं पाहिजे असा टोला फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. सामना हा आता पेपर राहिला नाही. मी तो वाचत नाही, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना खोचक टेला लगावला आहे.
हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊतांचा शब्द खरा ठरला!
सीमावादावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीमा वादावर आमचं सरकार फार गंभीर आहे. या प्रकरणात हरिष साळवे यांची नियुक्ती करण्याचा विचार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, NCP, Sharad Pawar